Success Story: महाबळेश्वरपेक्षा गोड स्ट्रॉबेरी अकोल्यात, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Success Story Of Strawberry In Akola: अकोल्यात शेतकऱ्याने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतले आहे. अकोल्यातील शेतकऱ्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

महाबळेश्वरपेक्षा 'गोड स्ट्रॉबेरी'चं उत्पादन आता विदर्भात सहज शक्य झालेये.. डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने स्ट्रॉबेरी'च्या पाच जातींवर संशोधन केलंये.. विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येत असल्याचे एका प्रयोगातून विद्यापीठाने सिद्ध करून दाखवले.आता विदर्भातल्या वातावरणात उत्पादन घेता येणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या 5 जातींवर कृषी विद्यापीठाने संशोधन हाती घेतले आहे. (Success Story)

Success Story
Success Story: कॉलेजमध्ये नापास; एकदा नाही तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS अनुराग कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

अकोल्यातल्या पातूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील वातावरण स्ट्रॉबेरी'साठी पोषक असल्याचे समोर आलेये.. यामुळे या भागातही या पिकांचा प्रसार करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा मानस आहेये. विशेष म्हणजे, तेल्हारा तालुक्यातल्या अंकित म्हसाळ या 26 वर्षीय तरुणाने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.. इतकेच नव्हेतर वर्धा जिल्ह्यातल्या सेलसुरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत 8 शेतकऱ्यांनी महाबळेश्वर येथून रोपे आणून 18 हेक्टरवर स्ट्रॉबेरी लागवड केलीए... नेमके काय सांगतात कृषी शास्त्रज्ञ पाहुयात.

एक एकरात चार ते पाच लाख रुपयांचं शेतकऱ्यांना उत्पादन झाले आहे. 2 लाखांपासून ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यत स्ट्रॉबेरीसाठी लागवड खर्च लागलाए.. त्यातून लागवड खर्च काढत 2 लाखांवर उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळालेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पुढाकार देत, मार्गदर्शन करीत आहेये.. स्ट्रॉबेरी पिकाची लागवड साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला केली जातंय.

Success Story
Success story: आर्मी ऑफिसरची लेक, परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडली, अन् तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; अंबिका रैना यांचा प्रेरणादायी प्रवास

ऑक्टोबरपासून जानेवरीपर्यंत विदर्भात हिवाळा ऋतू राहतो. म्हणून थंडीही चांगली राहते. विदर्भात थंडीसह प्रखर सूर्यकिरणेही या पिकावर पडते, आणि पुढं सूर्यकिरणे स्ट्रॉबेरी पिकात गोडवा निर्माण करण्याचं काम करते. विशेष म्हणजे, महाबळेश्वरमध्ये विदर्भाच्या तुलनेत थंडी फार जास्त राहतं. मात्र, तिथे पिकांना प्रखर सूर्य किरणामूळ मिळत नाहीए. परंतु विदर्भात सूर्यकिरण प्रखरपणे मिळतात. म्हणून विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्ट्रॉबेरी लागवडीवर भर दिलाय..

Success Story
Success Story: १४व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी पदरात दोन मुले, जिद्द सोडली नाही, IPS झाल्या, वाचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com