Success story
Success storySaam Tv

Success story: आर्मी ऑफिसरची लेक, परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडली, अन् तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; अंबिका रैना यांचा प्रेरणादायी प्रवास

Ambika Raina Success Story: यूपीएससी परीक्षा देण्यासाठी अंबिका रैना यांनी परदेशातील नोकरी नाकारली अन् भारतात परतल्या. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.
Published on

यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याची अनेकांची इच्छा असते. सरकारी अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. परंतु त्यामुळे आपण प्रयत्न सोडायचे नसतात. असंच काहीसं अंबिका रैना यांच्यासोबत झालं. त्यांनी २०२२ मध्ये यूपीएससी परिक्षेत १६४ रँक मिळवली. (Ambika Raina Success Story)

Success story
Success Story: यूपीएससी पॅनेलला जिंकणारा IPS, 3 इडियट्स'चा किस्सा अन् प्रेरणादायी प्रवास

अंबिका रैना या इंडियन ऑडिट एवं अकाउंट सर्व्हिसमध्ये अधिकारी आहे. अंबिका रैना यांनी सरकारी अधिकारी होण्यासाठी परदेशातील नोकरी सोडली. त्यांना स्विझरलँडमध्ये नोकरी मिळाली होती. त्यांनी तिथे आर्किटेक्चर फर्ममध्ये इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर त्यांना चांगल्या पॅकेजची नोकरीदेखील मिळाली होती. परंतु त्यांनी सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले.

अंबिका या मूळच्या जम्मू काश्मिरच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडिल भारतीय सैन्यात मेजर जनरल आहेत. त्यामुळेच अंबिका यांचे शिक्षण वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाले. त्यांनी अहमदाबादमधील कॉलेजमधून २०२० मध्ये आर्किटेक्चरमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांना परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. परंतु त्यांनी देशसेवेचा मार्ग निवडला.

Success story
Success Story: रतन टाटांची ७००० कोटींची ऑफर नाकारली, पाणी विकून कमावले २३०० कोटी रुपये; जयंती चौहान यांनी सक्सेस स्टोरी वाचा

अंबिका यांनी भारतात परत येऊन यूपीएससी परिक्षेची तयारी सुरु केली. सुरुवातीला दोन प्रयत्नात त्यांनी अपयश मिळाले. मात्र, त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात १६४ रँक मिळवली. त्या इंडियन ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसमध्ये काम करत आहेत. (UPSC Success Story)

अंबिका रैना यांनी मागील वर्षाचे पेपर सॉल्व करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना खूप फायदा झाला.अंबिका यांना सुरुवातीला खूप प्रॉब्लेम झाला. परंतु नंतर त्यांनी स्टडी प्लान बनवला. त्यानुसार त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली.

Success story
Success Story: आई-वडिलांचे काबाडकष्ट अन् पोराची मेहनत, कोल्हापूरच्या रोहितची उंच भरारी; 'इस्त्रो'त शास्त्रज्ञ म्हणून निवड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com