Anant Ambani and Radhika Merchant's Wedding Invite Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding Invite : अनंत- राधिकाची लग्नपत्रिका पाहिलीत का ?, अंबानी कुटुंबीयांकडून पाहुण्यांना खास गिफ्ट्स

Anant Ambani and Radhika Merchant's Wedding Invite : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचं येत्या जुलै महिन्यामध्ये लग्न आहे. त्याच्या लग्नाच्या पत्रिकेची पहिली झलक सोशल मीडियावर आलेली आहे.

Chetan Bodke

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचं येत्या जुलै महिन्यामध्ये लग्न आहे. दणक्यात साखरपुडा, २ प्री- वेडिंग दणक्यात केल्यानंतर हे कपल मुंबईमध्ये धमाकेदार पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे. यांचा लग्नसोहळा १२ जुलै ते १४ जुलै दरम्यान मुंबईच्या बांद्राच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.. अशातच सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. या हटक्या पद्धतीतल्या पत्रिकेने सर्वांचेच लक्ष आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी लग्नाच्या पत्रिकेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक चांदीचं मंदिर दिसत आहे. त्या मंदिरात हिंदू देवांच्या काही सोनेरी मूर्तीही पाहायला मिळत आहे. मुख्य पत्रिका उघडताच पत्रिकेत अनेक देवांचे फोटो आणि फ्रेम्स पाहायला मिळतायत. त्यामध्ये श्री गणेश, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, राधा-कृष्ण, देवी दुर्गा अशा देव-देवतांचे फोटो आणि फ्रेम्स पत्रिकेत आहेत.

लग्नाची पत्रिका देताना अंबानी कुटुंबीयांकडून पाहुण्यांना काही गिफ्ट्सही देण्यात येत आहे. पत्रिकेत लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळे कार्ड्स आहेत. बॉक्स उघडताच त्यातल्या एका डिझायनर कपड्यावर ‘अ’ आणि ‘र’ म्हणजेच अनंत आणि राधिका यांची अक्षरं लिहिलेली दिसत आहेत. यासोबतच एका बॉक्समध्ये मिठाईही दिसत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं १२ जुलै रोजी लग्न होणार आहे. हा लग्नाचा तीन दिवसांचा कार्यक्रम मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. १२ जुलैला लग्नसोहळा, १३ जुलै रोजी आशीर्वादाचा कार्यक्रम, १४ जुलै रोजी रिसेप्शन आहे. अनंत- राधिकाच्या लग्नाला राज्यातील महत्वाचे राजकीय मंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी, जगविख्यात बिझनेसमन सह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या लग्नाला उपस्थित राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT