Laila Khan Family Killing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laila Khan Case Verdict : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; सावत्र बापाला मृत्युदंडाची शिक्षा

Chetan Bodke

फेब्रुवारी २०११ साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर हत्या झाली होती. हत्या केल्यानंतर इगतपुरीमध्ये असलेल्या फार्महाऊसवर खड्ड्यात त्यांचे मृतदेह पुरण्यात आले होते. मात्र हत्येच्या तब्बल १३ वर्षानंतर मुंबईच्या सत्र न्यायालयाने लैलाच्या सावत्र वडिलांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.. मे महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने परवेझ टाक याला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्यामुळे दोषी परवेझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा नियोजित खून असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले आहे. हिंसाचाराचे क्रूर कृत्य करण्यात आले आणि एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

आरोपी परवेझ टाका हे लैलाच्या आईचे तिसरे पती होते. लैला आणि तिची आई आणि लैलाचे चार भांवडं आणि त्यांची अजून एक नातेवाईक फेब्रुवारी २०११मध्ये काही दिवस बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्यानंतर लैलाच्या वडिलांना मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यात अभिनेत्री लैला तिच्या कामानिमित्ताने जम्मू किंवा काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यासोबतच ती तिच्या पतीसोबत दुबईत असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आरोपी परवेज याने दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या हत्येप्रकरणी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाडमधील रोड कॉन्ट्रेक्टर आणि लैलाच्या आईचा तिसरा पती हे मुख्य संशयित आहेत.

८ फेब्रुवारी २०११ मध्ये इगतपुरी मधील फार्महाऊसवर सर्वांची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेने २०१२ मध्ये इगतपुरी येथील फार्महाऊसमधील खड्ड्यातून सहा सांगाडे जप्त केले होते. या गुन्ह्याप्रकरणी ३ ऑक्टोबर २०१२ रोजी गुन्हे शाखेने आरोपी टाक आणि या गुन्ह्यातील फरार आरोपी शाकीर हुसेन यांच्यावर हत्या आणि अपहरण अन्वये गुन्हा दाखल केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT