Shilpa Shetty Gold Scheme Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty And Raj Kundra News : शिल्पा शेट्टी-राजकुंद्राकडून सोने गुंतवणूक योजनेत फसवणूक?; कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Shilpa Shetty Gold Scheme Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा या दोघांवरही मुंबईच्या एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत फसवणुकीचा आरोप दाखल केलेला आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर फसवणुकीचा आरोप दाखल केलेला आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

मुंबई सत्र न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका सराफा व्यापाऱ्याने लावलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सराफा व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढे आरोप सिद्ध झाल्यास पोलिसांनी या प्रकरणात भादविच्या आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा. असं कोर्टाने या प्रकरणी निर्देश देताना सांगितले.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे सत्ययुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत, असे कोर्टात कोठारीच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले. त्यांनी २०१४ मध्ये एक योजना सुरू केली होती. ज्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना सोन्यासाठी अर्ज करताना सवलतीच्या दराने पूर्ण पैसे द्यावे लागतील आणि त्यांना मुदतपूर्तीच्या तारखेला सोन्याचे निश्चित प्रमाण दिले जाणार होते.

कोठारी यांनी या योजनेत ९० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानुसार तक्रारकर्त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर ५००० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप ते सोने अद्याप मिळालेले नाही. त्यानंतर २०२० मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने ९० लाख रुपये गुंतवले होते. योजनेनुसार अपेक्षित असलेले सोने कधीच ठरलेल्या तारखेला वितरित केले गेले नाही हा आरोपींनी कट रचला असून त्यांनी फसवणूक केली आहे आणि विश्वासार्हतेचा भंग केला आहे असं म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

अजित पवारांच्या निधनानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले- आमच्या घरातला माणूस गेलाय, एकदा मला...

Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT