Sangharsh Yoddha Public Review: मनोज जरांगेंवर आधारित ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट रिलीज, भुजबळ आणि सदावर्तेंची भूमिका कोणी साकारली?

Sangharsh Yoddha Movie Released: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Sangharsh Yoddha Trailer : मनोज जरांगेंच्या "संघर्षयोद्धा"चा ट्रेलर रिलीज
Sangharsh Yodha MovieSaam TV

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सगळ्याच थिएटरमध्ये या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून मराठा आरक्षणात दिलेल्या लढ्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये नेते छगन भुजबळ यांची भुमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी तर ॲड. सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.

Sangharsh Yoddha Trailer : मनोज जरांगेंच्या "संघर्षयोद्धा"चा ट्रेलर रिलीज
Raj Thackeray Birthday : “फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव....”, राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, जाणून घेऊया प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. "नेते मनोज जरांगे पाटील यांचं सर्व जीवन आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट खरंतर निवडणूकीच्या पूर्वी रिलीज व्हायला हवा होता. पण तो निवडणूकीच्या नंतर होत असला तरी प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची वेगळीच उत्सुकता आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका वठवली आहे. मनोज जरांगे पाटील यांची संपूर्ण कथा रियल आहे. चित्रपट दमदार असून कथानक खुर्चीवर खिळवून ठेवणारे आहे."

अनेक प्रेक्षकांनी 'संघर्षयोद्धा' चित्रपटाचे कौतुक केले असून सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. अंतरवाली सराटीमध्ये सुरु केलेल्या आंदोलनापासून ते संपूर्ण राज्यात सुरू केलेल्या सभांपर्यंतचे सर्व मुद्दे चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. "हा चित्रपट पाहताना वाटतच नाही की, एक चित्रपट पाहतोय. एक रियल स्टोरी पाहताय असंच वाटत आहे." अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिलेली आहे. सध्या सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.

Sangharsh Yoddha Trailer : मनोज जरांगेंच्या "संघर्षयोद्धा"चा ट्रेलर रिलीज
Stree 2 Promo : राजकुमार राव स्टारर 'स्त्री २'चा नवा प्रोमो आउट, रिलीज डेटही आली समोर

या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. चित्रपटामध्ये नेते छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता रोहन पाटील सह अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विनीत भोंडेसह अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत.

Sangharsh Yoddha Trailer : मनोज जरांगेंच्या "संघर्षयोद्धा"चा ट्रेलर रिलीज
Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट्ट पुन्हा एकदा डीपफेकची शिकार, अभिनेत्रीचा नवा ट्रेंडिंग व्हिडीओ होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com