डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही
सरकारने आता मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे जर आता धोका झाला, तर मराठा समाजाचा मोठा अपमान आहे. मग मात्र, त्यांचे खूप हाल होती. विधानसभेत काय करायचं, त्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगेंना दिला आहे. आज आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण देऊ, असं सत्ताधारी म्हणाले आहेत. त्यामुळे एक महिना वेळ दिला. मंत्र्यांना म्हणालो दगे फटाके देऊ नका , रस्त्यावर उतरवू नका. तुम्ही आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला ४ ते ५ समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरणार आहे, असा इशारा जरांगेंनी थेट सरकारला दिला आहे.
मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. शहागड येथे आम्हाला कार्यालय घ्यावं लागणार आहे. आंतरवली सोडायचा विषय नाही. लोकांना त्रास होऊ (Manoj Jarange Patil Hunger Strike) नये. वर्दळ होईल म्हणून शाहागड येथे कार्यालय करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आंतरवली गावाचे उपकार कधीच विसरणार नाही. राज्यपातळीच काम आता आजपासून सुरु आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहे.
उपोषण सोडवताना 'मराठा कुणबी कायदा करण्यासाठी आम्हाला कायदा आणून आरक्षण टिकवायचं आहे' हे शब्द होते. मागील दहा महिन्यांपासून आम्ही लढत आहे. थोडा वेळ समाजाला विचारून दिल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं (Maratha Reservation) आहे. शंभूराजे यांनी सांगितलं सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून खूप कामाला लागणार आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहे. अन्याय करायचं प्रयत्न केले तर मी मागे हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगेवर चित्रीत झालेल्या चित्रपटावर बोलताना ते म्हणाले की, चित्रपटात माझा जीव नाही, आरक्षणात जीव आहे. चित्रपट तयार करणाऱ्यांना शुभेच्छा. मला आठ दिवस उठता येत नाही नंतर (Vidhan Sabha) बघेल. फडवणवीसांवर बोलताना जरांगे म्हणाले की, एसआयटी माझी मागणी नाही. सागे सोयरे ही मागणी आहे. मी मागणी केली नाही, समाजाने मागणी केली असल्याचं ते म्हणाले आहेत.
एसआयटी स्थापन झाले तेव्हा बाकडं न वाजवणारे खासदार आता भेटायला यायला लागले. अनेक आमदार उड्या मारत टेबल वाजवत होते, जे वाजवत नव्हते ते भेटायला येत असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. आम्हाला कुणीही आरक्षण द्या, नाही दिलं तर पुढची रणनीती वेगळी असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.