Shraddha Thik
बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.
शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.
शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता.
शिल्पाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.
शिल्पाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.
आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे. फोटोंमध्ये शिल्पाचा शाही लूक पाहायला मिळत आहे.