Maratha Reservation SC: क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी पूर्ण, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय देणार काही तासात निर्णय

Maratha Reservation SC News: आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा समाजासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर आज सुनावणी पार पडली.
Maratha Reservation SC
Maratha Reservation SCSaam Digital

Maratha Reservation SC

आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा समाजासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पीटिशनवर आज सुनावणी पार पडली. ५.३० वाजेपर्यंत निर्णय येणं अपेक्षित असून या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोरही सुनावणी पार पडली.

दरम्यान याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणावरील सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. आज कोर्टाकडून आम्हाला निश्चित सकारात्मक अपेक्षा आहे. ओपन कोर्टात सुनावणी घेण्याचा आमचा आग्रह आहे, तसं झाल तर राहिलेले मुद्दे पुन्हा एकदा व्यवस्थित मांडता येतील.राज्यात जे सर्वेक्षण सुरू आहे त्याचा नक्की फायदा ओपन सुनावणी वेळी होईल. त्यामुळे सरकारचं हे सकारात्मक पाऊल आहे. दरम्यान मनोज जरांगे यांचा विषय राज्याचा आहे. सरकार ने त्यांना शब्द दिला आहे तर तो त्यांनी पूर्ण करावा. त्यांना मुंबईला येऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation SC
Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! कोल्हापुरात मविआला सापडला लोकसभेसाठी तगडा उमेदवार ? शिंदे गटाला देणार कडवी टक्कर

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. राज्य सरकारने यावेळी सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Maratha Reservation SC
Maharashtra Political News: आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपची फिल्डिंग; युवा मतदारांना आकर्षिक करण्यासाठी आखली रणनीती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com