सूरज मसूरकर, मुंबई
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वरळीत ठाकरे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपने थेट आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन केलं आहे. (Latest Marathi News)
भाजप नेते, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वरळीच्या जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन केलं आहे. त्यात विटी-दांडूसहित १६ देशी खेळांचा सामावेश आहे. २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबई शहर व उपनगरातील विविध मैदानावर होणार स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांपेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपकडून ठाकरे गटाला घेरण्याची तयारी सुरु झाली आहे. तरुण खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे बोललं जात आहे. २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचे आयोजन केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २६ जानेवारीला वरळीतील जांभोरी मैदान येथे होणार आहे.
या स्पर्धेत लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उडया, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या १६ पारंपारिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. दरम्यान, या स्पर्धांच्या आयोजनामुळे ठाकरे गट विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.