Juna Furniture Film Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Juna Furniture Trailer: ‘या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच !’; ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Juna Furniture Film: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत त्या चित्रपटातील टीझर आणि काही गाणे रिलीज झाले आहेत. अशातच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे.

Chetan Bodke

Juna Furniture Trailer

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिलेले आहेत. त्यांचे चित्रपट रिलीज होणार म्हंटल्यावर चाहत्यांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरते. गेल्या काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत त्या चित्रपटातील टीझर आणि काही गाणे रिलीज झाले आहेत. अशातच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. आई- वडीलांच्या नात्याबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला रिलीज होणार आहे.

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून... दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना... आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे.

आई, वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘जुना फर्निचर’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. (Marathi Film)

या सोहळ्याला अधिक रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या 'सोबतीचा करार' या संगीत मैफलचेही आयोजन करण्यात आले होते. यात स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचा सहभाग होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी 'काय चुकले सांग ना?' या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या. (Marathi Actors)

'जुनं फर्निचर... या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !" ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळते. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडीलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार ?, असा प्रश्न आपल्याला ट्रेलरमध्ये पडतो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' चे यतिन जाधव निर्माते आहेत. 'जुनं फर्निचर'ची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT