Juna Furniture Movie: महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'मधील 'काय चुकले सांग ना ?' गाणं रिलीज

Kay Chukle Saang Na Song Out: या चित्रपटाचे एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचा टीजरच्या नंतर मनाला भिडणारे 'काय चुकले सांग ना ?' हे गाणं रिलीज झाले. या गाण्याला महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे.
Juna Furniture Movie
Juna Furniture MovieSaam Tv News

Juna Furniture Movie:

मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांच्या 'जुनं फर्निचर' (Juna Furniture Movie) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचा टीजरच्या नंतर मनाला भिडणारे 'काय चुकले सांग ना ?' हे गाणं रिलीज झाले. या गाण्याला महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे.

सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत, यतिन जाधव निर्मित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अशामध्ये 'जुनं फर्निचर' मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणं नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'काय चुकले सांग ना ?' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याला महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे.

जुना फर्निचर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब आणि शरद पोंक्षे हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Juna Furniture Movie
Abhishek And Sonali Engagement: शिवानी सोनार पाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने उरकला गुपचूप साखरपुडा, होणारी बायको आहे सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर

महेश मांजरेकर यांनी या गाण्याबद्दल सांगितले की, 'या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे गाणं आहे. हे गाणं मला गायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. हे गाणं म्हणजे चित्रपटाचा कणा आहे. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.'

Juna Furniture Movie
Amruta Khanvilkar: ‘ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या...’, अमृता खानविलकरने ट्रोलर्सला दिलं सणसणीत उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com