Amruta Khanvilkar: ‘ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या...’, अमृता खानविलकरने ट्रोलर्सला दिलं सणसणीत उत्तर

Amruta Khanvilkar Post: कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी अमृता खानविलकर अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अशातच अमृताने सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत.
Amruta Khanvilkar Reply To Trollers
Amruta Khanvilkar Reply To TrollersSaam Tv

Amruta Khanvilkar Reply To Trollers

मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी अमृता अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. कायमच ती वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल झाली आहे. अशातच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत. (Marathi Actress)

Amruta Khanvilkar Reply To Trollers
Bhagyashree Mote Divorce: अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट करत दिली माहिती

अमृताने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये ती म्हणते की, "आशा करते तुमचा गुढीपाडवा छान साजरा झाला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार. नवीन मनोकामना, नवी स्वप्ने, देवा चरणी ठेऊन ती पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना केली असणार. जर तुम्ही हे सगळं केलय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी ही हेच केलं. कारण मी देखील फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे. संस्काराने मराठी आहे. मूळची कोकणातील, पण जन्म मुंबईचा आहे, मी ही कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, मावशी आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, बायको आहे आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्या मुळे मी एक अभिनेत्री आहे." (Social Media)

"तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळे interviews देत आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर, आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते. वेशभूषा असो, हसणं असो, बोलणं असो, एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती, किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये? जे लोक स्वतःचं खरं नाव किंवा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात? मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे." (Trolled)

Amruta Khanvilkar Reply To Trollers
Taapsee Pannu On Marriage With Mathias Boe: “खासगी आयुष्यात मला लोकांना…”, तापसी पन्नूने लग्नाबद्दल मौन सोडलं

"सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये... पण ह्यावर जे तुम्ही लिहिता... बोलता... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात. असो, मी normally ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे. अमृता खानविलकर", असं उत्तर अमृताने ट्रोलर्सला पोस्टच्या माध्यमातून दिलेले आहे. (Marathi Film)

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटातून अमृता खानविलकरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या अभिनयाचे आणि तिच्या डान्स फक्त देशातच नाही तर, जगभरामध्ये जोरदार कौतुक झाले. अमृता आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बाबूराव' यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. (Entertainment News)

Amruta Khanvilkar Reply To Trollers
Naad The Hard Love: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड दिसणार अनोख्या भूमिकेत, ‘नाद’चा पोस्टर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com