Abhishek And Sonali Engagement: शिवानी सोनार पाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने उरकला गुपचूप साखरपुडा, होणारी बायको आहे सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर

Abhishek Gaonkar And Sonali Gurav: गुढीपाडव्याचा मूहूर्तावर 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतील अभिषेक गावकरने साखरपुडा केला आहे.
Abhishek Gaonkar And Sonali Gurav Engagement
Abhishek Gaonkar And Sonali Gurav EngagementInstagram

Abhishek Gaonkar And Sonali Gurav Engagement

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. यानंतर आता मराठीतील अजून एका कलाकाराने साखरपूडा उरकला आहे. गुढीपाडव्याचा मूहूर्तावर सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील अभिषेक गावकरने साखरपुडा केला आहे.

झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेतील श्रीनू हे पात्र अभिषेक गावकर साकारत आहे. अभिषेक नुकताच सोनाली गुरवसोबत साखरपुडा केला आहे. सोनाली ही सोशल मीडिया इन्फ्लुएनसर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ पोस्ट करत असते.

Abhishek Gaonkar And Sonali Gurav Engagement
Amruta Khanvilkar: ‘ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या...’, अमृता खानविलकरने ट्रोलर्सला दिलं सणसणीत उत्तर

गेल्या काही वर्षांपासून अभिषेक आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी आता साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि सोनाली गुरवने गणपती पुळेला जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते.त्यांचे गणपतीपुळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिषेकने 'सारं काही तिच्यासाठी', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'माझी माणसं', 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत काम केले आहे. तर सोनाली सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

Abhishek Gaonkar And Sonali Gurav Engagement
Bhagyashree Mote Divorce: अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट करत दिली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com