मुंबई- मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांच्या बाबतीत एक महत्वाची माहिती मिळते आहे. महेश यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग Bladder Cancer झाल्याने उपचारासाठी त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतीच त्यांच्यावर शस्रक्रिया Surgery करण्यात आली आहे. सध्या शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर यांची प्रकृती स्थिर असून ते राहत्या घरी विश्रांती घेत आहेत.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाल होत. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा दिवसांपूर्वी महेश यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे आणि सद्य त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. महेश मांजरेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते सध्या त्यांच्या राहत्या घरी विश्रांती घेत आहेत.
महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीसोबत Marathi Movies हिंदी चित्रपटांमध्येही Hindi Movies नाव कमावलं आहे. 'वॉन्टेड','रेडी', 'दबंग', 'जिंदा', 'मुसाफिर' आणि 'कांटे' या चित्रपटात भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.