Do You Know Prakash Raj Real Name Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prakash Raj Birthday: १२ वर्षे लहान कोरिओग्राफरसोबत प्रकाश राज यांनी थाटला दुसरा संसार, अभिनेत्याचं खरं नाव माहितीये का?

Prakash Raj: प्रकाश राज एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते तर आहेतच पण सोबतच ते एक राजकीय नेते देखील आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Chetan Bodke

Do You Know Prakash Raj Real Name

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या खलनायिकी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणाऱ्या अभिनेते प्रकाश राज यांचा आज वाढदिवस. ते आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रकाश राज एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते तर आहेतच पण सोबतच ते एक राजकीय नेते देखील आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. (Tollywood)

प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिता कुमारी यांच्यासोबत २५ डिसेंबर १९९४ रोजी लग्न केले होते. प्रकाश आणि ललिता यांना दोन मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य होते. त्यांच्या मुलाने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. (Prakash Raj)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकाश यांचा मुलगा सिद्धू पतंग उडवताना टेबलावरून खाली पडला. पण, तब्बल महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. ललिता यांनी आपल्या मुलाच्या निधनामुळे खूपच दु:खी होत्या.

त्यामुळे ललिता यांनी प्रकाश राजपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या निधनाच्या ५ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. (Bollywood News)

प्रकाश राज यांनी १२ वर्षे लहान असलेल्या कोरिओग्राफर पोनी वर्मासोबत २०१० मध्ये दुसरे लग्न केले. प्रकाशने पोनीसोबत लग्न करण्याआधी आपल्या दोन्हीही मुलींची परवानगी घेतली होती. प्रकाशने मिळालेल्या माहितीनुसार, पोनीसोबत लग्न करण्यापूर्वी त्याने आपल्या मुलींना पोनीसोबत काही वेळ घालवण्यास सांगितले होते. दोन्हीही मुलींच्याच परवानगीने प्रकाश आणि पोनीने दुसरे लग्न केले होते. प्रकाश आणि पोनी यांना एक मुलगाही आहे. (Bollywood Film)

प्रकाश राज यांचे खरं नाव प्रकाश राय होते. प्रकाश यांनी के बालचंदर यांच्या पहिल्या चित्रपटातूनच प्रकाश राज हे नाव ठेवले. प्रकाश राज यांचा हा चित्रपट इतका यशस्वी झाला की, त्यांनी आपले आडनाव ‘राय’वरून ‘राज’ ठेवले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT