Shraddha Kapoor आणि Rahul Modi रिलेशनशिपमध्ये? श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship: सोशल मीडियावर श्रद्धा कपूरच्या गळ्यातल्या एका लॉकेटची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये श्रद्धा आणि राहुलच्या रिलेशनशिपची चांगलीच चर्चा होत आहे.
Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship
Shraddha Kapoor And Rahul Modi RelationshipSaam Tv

Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship

'आशिकी' फेम श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. श्रद्धा कपूरचे नाव 'तू झुटी मैं मक्कर' चित्रपटाचा लेखक राहुल मोदीसोबत (Rahul Modi) जोडले जात आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहेत. (Bollywood)

अद्याप दोघांनीही रिलेशनबद्दल जाहीर भाष्य केलेले नाही. नुकतंच श्रद्धा आणि राहुलने अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये एकत्र हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या सोशल मीडियावर श्रद्धा कपूरच्या गळ्यातल्या एका लॉकेटची जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood Actress)

Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship
Aishwarya Sharma : मी प्रेग्नंट नाही! ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टच सांगितलं

श्रद्धा कपूर कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच फोटो शेअर केलेले आहेत. काल श्रद्धाचा रविवारचा दिवस अगदीच निवांत गेला. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर काही सेल्फी शेअर करताना कॅप्शन दिले की, 'मी काहीच करत नाहीए कारण आज shrunday आहे.' असं कॅप्शन तिने दिलंय. तिची ही कमेंट पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्लीतर उडवलीच, पण तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले. (Bollywood News)

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, श्रद्धाच्या गळ्यात R नावाचं लॉकेट आहे. जरीही कपलने रिलेशनबद्दल सांगितलं नसलं तरीही एका लॉकेटमुळे श्रद्धाच्या आणि राहुलच्या नावाच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. तर चाहत्यांनी त्या नावाचे वेगवेगळे तर्कवितर्क लावलेलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकत्र फोटो क्लिक करण्यासाठी अजिबात घाबरत नाहीत. पण दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करण्याबाबत कोणताही विचार केलेला नाही. (Social Media)

Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship
Aishwarya And Avinash Narkar Video: “बसं एवढं आयुष्यात...”; ऐश्वर्या- अविनाशचा धुलिवंदननिमित्त हटके डान्स, नेटकऱ्यांनी केले कौतुक

श्रद्धा आणि राहुल नेहमीच मीडियापासून सावध असतात. दोघेही कधीच कॅमेऱ्यासमोर येत नसायचे. पण आता हे कपल बिनधास्तपणे एकत्र कॅमेऱ्यासमोर येतात. गेल्या वर्षी दोघेही मुंबईत डिनर डेटवर दिसले होते. त्यानंतर दोघेही डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. सूत्रांनुसार, या कपलच्या कुटुंबाला त्यांची जोडी प्रचंड आवडते. २०२२ मध्ये श्रद्धाने फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप केले होते. त्यानंतर राहुल मोदी तिच्या आयुष्यात आला.  (Entertainment News)

Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship
Karisma Kapoor Reveal Name: करिश्मा कपूरचं नेमकं खरं नाव काय ?, खुद्द अभिनेत्रीनेच केला महत्वाचा खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com