Aishwarya Sharma : मी प्रेग्नंट नाही! ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टच सांगितलं

Aishwarya Sharma Pregnancy : तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा म्हणजे फक्त अफवा आहेत, असं तिने म्हटलंय. या आधी देखील ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरल्या आहेत.
Aishwarya Sharma
Aishwarya SharmaSaam TV

Bollywood Actress News :

बिग बॉस १७ फेम अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा सध्या तिच्या प्रकृतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी ती एका कार्यक्रमात गेली होती. तेथे ऐर्श्वर्या चक्कर येऊन पडली. तिची तब्येत ठिक नसल्याने तिला चक्कर आली होती. मात्र सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या सर्व चर्चांना अभिनेत्रीने स्वत: प्रत्युत्तर दिलं आहे.

Aishwarya Sharma
Actress Radhika Apte: विमानतळावर अडकली अभिनेत्री राधिका आपटे, पोस्ट शेअर करत म्हणाली 'ना वॉशरुम, ना पाण्याची सोय…,'

तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा म्हणजे फक्त अफवा आहेत, असं म्हटलंय. या आधी देखील ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरल्या आहेत. आता तिसऱ्यांदा अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे ऐश्वर्याने यावेळी नेटकऱ्यांना कठोर शब्दांत सुनावत त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

ऐश्वर्याची पोस्ट

" मी तिसऱ्यांदा ओरडून सांगते की मी प्रेग्नंट नाही. सतत येणाऱ्या मॅसेजचा आता मला फार त्रास होत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा पसरवणं बंद करा", असं तिने म्हटलं आहे.

चक्कर का आली?

पुढे पोस्टमध्ये तिने आपल्याला चक्कर नेमकी का आली याचं कारण देखील सांगितलं आहे. "मी सुद्धा एक माणूस एक व्यक्ती आहे. बऱ्याचदा माझं बीपी कमी होतं. मी चक्कर येऊन बेशुद्ध झाले तेव्हा माझं ब्लड प्रेशर 60-80 होतं. त्यामुळे मी सेटवरच चक्कर येऊन पडले होते. पुन्हा सांगते मी प्रेग्नंट नाही", असं ऐश्वर्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

होळी सणानिमित्त ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी होळी स्पेशल इव्हेंटच्या शुटीगसाठी डान्स प्रॅक्टीस करत होती. तालमीदरम्यानच तिला चक्कर आली आणि ती धाडकन खाली कोसळली. ट्रीटमेंटसाठी तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर काही काळ आराम केल्यावर ऐश्वर्याने आपलं शूटिंग पूर्ण केलं होतं.

Aishwarya Sharma
Marathi Actress : मराठी अभिनेत्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; शिवप्रेमींकडून माफी मागण्याची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com