Marathi Actress : मराठी अभिनेत्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; शिवप्रेमींकडून माफी मागण्याची मागणी

Prarthana Behere Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : जयंतीनिमित्त मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. यावरून शिवप्रेमींनी प्रार्थना बेहेरेचा निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे.
Prarthana Behere
Prarthana BehereSaam tv

संदिप भोसले, लातूर

Prarthana Behere News:

देशासहित राज्यभरात मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवप्रेमी नागरिक अभिवादन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी नागरिक मोठ्या आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. या जयंतीनिमित्त मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. यावरून शिवप्रेमींनी प्रार्थना बेहेरेचा निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

लातूरच्या उदगीर येथे एका मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. या उद्घाटनादरम्यान बेहेरेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना सलग 4 ते 5 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. यामुळे उदगीर शहरातील शिवप्रेमी तरुणांनी तिचा निषेध केला.

उदगीरमध्ये प्रार्थना बेहेरेच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडले आहेत. तर प्रार्थना बेहेरेने केलेल्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागावी, अशी देखील मागणी तरुणांनी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prarthana Behere
शाहिद- क्रितीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली, ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ ची 100 कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री

प्रार्थना बेहेरे उपस्थितांना काय म्हणाली?

प्रार्थनाने म्हटलं की, आजच्या जयंतीनिमित्त लातूरच्या उदगीरमध्ये आल्यामुळे उगगीरकर जयंती कशी साजरी करताहेत, हे पाहायला मिळालं. शहरात रॅली सुरु होती. सर्व ठिकाणी भगवा झेंडा फडकत होता. हे दृश्य पाहून छान वाटलं. अभिमान वाटला. तुम्हा सर्वांचे खूप आभार. मला बोलावल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार'. दरम्यान, प्रार्थनाकडून उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना तिच्याकडून एकेरी उल्लेख झाला. यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024)

Prarthana Behere
Naseeruddin Shah On Bollywood: नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचे टोचले कान; व्यक्त केली मोठी खंत

शिवप्रेमी तरुणांचं म्हणणं काय?

उदगीरमधील शिवप्रेमी तरुणांनी प्रार्थना बेहेरेच्या वक्तव्याचा निषेध केला. एका शिवप्रेमी तरुणानं म्हटलं की, 'आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे तिचा निषेध. तिने माफी मागावी. ती माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच सुरू ठेवणार आहोत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com