Naseeruddin Shah On Bollywood: नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचे टोचले कान; व्यक्त केली मोठी खंत

Naseeruddin Shah Interview: नसिरूद्दीन शाह यांनी बॉलिवूडला घरचा आहेर दिला आहे. फक्त पैसे कमावण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करणं बंद करा, तेव्हाच चांगल्या चित्रपटांची निर्मिती होऊ शकेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Naseeruddin Shah On Bollywood
Naseeruddin Shah On BollywoodSaam Tv
Published On

Naseeruddin Shah On Bollywood

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच आपल्या अभिनयामुळे नाही तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सर्वाधिक सक्षम अभिनेत्यांपैकी एक असलेले नसीरूद्दीन शाह. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली आहे.

नुकतंच नसिरूद्दीन शाह यांनी बॉलिवूडला घरचा आहेर दिला आहे. फक्त पैसे कमावण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करणं बंद करा, तेव्हाच चांगल्या चित्रपटांची निर्मिती होऊ शकेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. हे वक्तव्य त्यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमामध्ये केलं आहे. (Bollywood)

Naseeruddin Shah On Bollywood
Sidharth Malhotra आणि Disha Patani च्या 'योद्धा'ची धमाकेदार टीझर आऊट

नसीरुद्दीन शाह कायमच इंडस्ट्रीसोबत, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर आपले परखड मत ते मांडत असतात. अनेकदा त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच कलाकारांवरही निशाणा साधला आहे. अशातच पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडला घरचा आहेर दिला आहे. (Bollywood film)

नवी दिल्लीत 'मीर की दिल्ली, शाहजहांनाबाद: द इवॉल्विंग सिटी' या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हिंदी सिनेसृष्टीला १०० वर्षे झाली आहेत. तेव्हापासून चित्रपट निर्माते एकच धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करीत आहेत. ही गोष्ट मला वैयक्तिकरित्या निराश करते. त्यामुळे मी हिंदी चित्रपट पाहणं बंद केले आहे. मला ते अजिबात आवडत नाहीत.” (Bollywood News)

नसीरुद्दान शाह पुढे मुलाखतीमध्ये म्हणतात, “भारतीय जेवणाला जगभरात पसंदी दर्शवली जाते, कारण त्यात दम आहे. मग तसाच दम हिंदी चित्रपटांमध्ये का नाही? जगभरातले भारतीय वंशाचे नागरिक हिंदी चित्रपटाला खूप पसंदी दर्शवतात. कारण त्यांची नाळ त्या चित्रपटासोबत जोडली गेलेली आहे. पण लवकरच तुम्हाला हे चित्र पूर्ण बदलेले दिसेल. फक्त पैसे कमावण्याच्या हेतूने तुम्ही ज्यावेळी चित्रपटाची निर्मिती करणं बंद कराल, तेव्हाच चांगल्या चित्रपटांची निर्मिती होऊ शकेल..” असं म्हणत नसीरूद्दीन यांनी बॉलिवूडला घरचा आहेर दिला आहे. (Bollywood Actor)

Naseeruddin Shah On Bollywood
Shaitaan New Poster: 'जब बात परिवार पर आए, तो...', अजय देवगणच्या 'शैतान'चे नवीन पोस्टर आऊट

“मला असं वाटतंय की, आता खूप उशीर झालेला आहे. ज्या आशयाचे चित्रपट प्रेक्षक पाहतात, त्या आशयाच्या चित्रपटांची निर्मिती होणे आता काही थांबणार नाही. पण जे निर्माते गंभीर विषय असलेल्या चित्रपटाची निर्मिती करतात. त्यांनी आपल्या चित्रपटाच्या कथेत वास्तविकता आणि सत्य गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करावा.”असं आपल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले. (Entertainment News)

Naseeruddin Shah On Bollywood
Article 370 Film: यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’चा काश्मिरमध्ये प्रिमियर होणार नाही; निर्मात्यांनी सांगितलं खरं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com