राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपट येत्या २३ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरामध्ये रिलीज होणार आहे. पण यामी गौतमच्या ह्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं काश्मिरमध्ये प्रमियर होणार नाही. याबद्दलचं कारण खुद्द निर्मात्यांनी दिली आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये, त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. (Bollywood)
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत निर्माते आदित्य धर यांना चित्रपटाचं काश्मिरमध्येही प्रिमियर होणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आदित्य धर म्हणाले, “नाही, आधी आम्ही काश्मीरमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरबद्दलची चर्चा करत होतो. पण अभिनेत्री यामी गौतम प्रेग्नेंट असल्यामुळे आम्ही हा विचार करत नाहीये.” (Bollywood film)
“यामुळे आम्ही आमचा प्रवास खूपच कमी केला आहे. म्हणूनच आम्ही बहुतेक मुलाखती ऑनलाइन पद्धतीनेच करीत आहोत. तिच्या प्रेग्नेंसीमुळे आम्ही ठरवले की चित्रपटाचा प्रीमियर फक्त आसपासच्या शहरांमध्येच व्हावा जेणेकरून यामीला यामुळे कोणतीही अडचण येऊ नये. अन्यथा चित्रपटाचा प्रीमियर आम्ही काश्मीरमध्ये नक्कीच केला असता.” (Bollywood News)
‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंगवेळी यामी गौतमीच्या बेबीबंपची चर्चा रंगली होती. ट्रेलर लॉंचिंग इव्हेंटनंतर सोशल मीडियावर आदित्य धर पत्नी यामीची काळजी घेतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ट्रेलर लाँच इव्हेंटला आलेल्या यामी गौतमीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. यामी गौतमी यावेळी ब्लेझरने आपला बेबी बंप कव्हर करताना दिसली. (Viral Video)
“प्रेग्नेंट झाल्यानंतर मला खूप सशक्त वाटत आहे. मातृत्वपण मला एक आनंद देणारी गोष्ट आहे. पोटातल्या छोट्याशा परीचा जेव्हा आपण सांभाळ करतो, त्यावेळी मनामध्ये खूप सुंदर भावना असते. यासोबतच मातृत्व आपल्याला जबाबदारीची जाणीव देते.” अशी भावना अभिनेत्रीने एका मुलाखतीतून शेअर केली आहे. (Bollywood Actress)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘आर्टिकल ३७०’चे दिग्दर्शन करण्यात आले आहे. काश्मीरमधील राजकारण, भ्रष्टाचार आणि दहशतवाद चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. चित्रपटात यामी गौतम आणि प्रियमणीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपट येत्या २३ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरामध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.