महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९४वी जयंती आहे. आजवर आपण त्यांच्या शौर्यगाथेवर आधारित अनेक चित्रपट आणि मालिका पाहिल्या आहेत. महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटांची यादी पाहणार आहोत. तुम्ही ओटीटीवर महाराजांचे चित्रपट पाहून शिवजयंती साजरी करू शकतात.
एका मराठी व्यक्तीला शिवाजी महाराजांचे विचार अन्यायासोबत लढण्यासाठी कसे मदत करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
‘शिवरायांच्या अष्टक’यातील हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा शिवरायांचा मावळा म्हणून प्रसिद्ध असलेले कोंडाजी फर्जंद यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आह . हा चित्रपट तुम्ही ‘झी ५’ या ओटीटीवर पाहू शकता.
‘शिवरायांच्या अष्टक’यातील हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. हा चित्रपट तुम्ही ‘झी ५’ या ओटीटीवर पाहू शकता.
हिरकणीची कथा आपण शाळेमध्ये पुस्तकामध्ये वाचली होती. हिच कथा आपल्याला चित्रपटातूनही पाहायला मिळाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
बाजीप्रभु देशपांडे यांनी लढवलेल्या पावनखिंडीची लढाई चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीमध्ये या ही चित्रपटाचा समावेश आहे. चित्रपटाचे कथानक सरसेनापती हंबीरराव यांच्यावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही ‘डीज्ने प्लस हॉटस्टार’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
महाराजांची आणि अफजल खानाची भेटीचे चित्रपटाचे कथानक आहे. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
चित्रपटाची कथा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. तानाजी मालुसरे यांच्याबद्दल आपण शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेले आहे.
चित्रपटामध्ये सुभेदार यांचा सरदार ते सुभेदार हा प्रवास दाखवला आहे. तसेच त्यांचे वेगवेगळे पैलूही दाखवले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.