Karisma Kapoor Reveal Name: करिश्मा कपूरचं नेमकं खरं नाव काय ?, खुद्द अभिनेत्रीनेच केला महत्वाचा खुलासा

Karisma Kapoor News: नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्या नावाचा खरा उच्चार काय आहे, याबद्दल भाष्य केलं आहे.
Karisma Kapoor Reveal Real Name
Karisma Kapoor Reveal Real NameSaam Tv

Do You Know Karisma Kapoor Real Name

९०च्या दशकातील हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक करिश्मा कपूर एक मानली जाते. करिश्माने तिच्या सिनेकरियरमध्ये चाहत्यांना अनेक गाजलेले चित्रपट दिलेले आहेत. सध्या अभिनेत्री नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्यानिमित्त अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्या नावाचा खरा उच्चार काय आहे, याबद्दल भाष्य केलं आहे.

Karisma Kapoor Reveal Real Name
Kushal Badrike: 'बालपण मागे सुटत जातं, पण खोड्या...' कुशल बद्रिकेने शेअर केला होळी सेलिब्रेशनचा खास VIDEO

मुलाखतीमध्ये करिश्माला तिच्या नावाचा नेमका उच्चार काय आहे?, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर करिश्माने दिलेल्या उत्तराने सगळ्यांनाच थक्क केले आहे. अभिनेत्री म्हणाली, "माझे नाव करिश्मा कपूर नाही. इतकी वर्षे लोक मला चुकीच्याच नावाने हाक मारत आहेत. मी लोकांच्या चुका सुधारत नाही बसत. ज्यांना ज्या नावाने मला बोलवायचं आहे, तसं बोलवू द्या. पण माझ्या नावाचं खरं उच्चारण 'करिज्मा' असं आहे. 'करिश्मा' नाही." (Bollywood)

करिश्मा कपूरचे हे बोलणं ऐकून तिचा को-स्टार पंकज त्रिपाठीही अचंबित झाला. पंकज त्रिपाठी करिश्माला म्हणतो, 'मला सांग, आजपर्यंत आम्ही तुला नेहमीच चुकीच्या नावाने हाक मारतो.' करिश्माचे नावाबद्दलचे विधान ऐकूण सर्वच थक्क झाले. करिश्मा कपूरचा खुलासा ऐकून विजय वर्मा म्हणतो, “यापेक्षा तुला लोलो नावानेच हाक मारणं उत्तम आहे.” संपूर्ण कपूर कुटुंबीय करिश्माला लोलो नावानेच हाक मारतात. (Bollywood News)

Karisma Kapoor Reveal Real Name
बॉक्स ऑफिसवर ‘Swatantrya Veer Savarkar’ चित्रपटापेक्षा ‘Madgaon Express’ची यशस्वी घोडदौड, पहिल्या विकेंडला कमावले ‘इतके’ कोटी

अभिनेत्री करिश्मा कपूरने ‘कुली नंबर वन’, ‘बीवी नंबर वन’ अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले. १९९१ पासून करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्रेम कैदी’ चित्रपटात करिश्माने मोठ्या पडद्यावर डेब्यू केले. करिश्मा कपूर नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा ही स्टारकास्टही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  (Entertainment News)

Karisma Kapoor Reveal Real Name
विश्वासार्ह लोकसेवक बनण्यास मी उत्सुक, Kangana Ranaut ने भाजपकडून तिकीट मिळताच मानले आभार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com