बॉक्स ऑफिसवर ‘Swatantrya Veer Savarkar’ चित्रपटापेक्षा ‘Madgaon Express’ची यशस्वी घोडदौड, पहिल्या विकेंडला कमावले ‘इतके’ कोटी

Swatantrya Veer Savarkar Madgaon Express Day 3 Collection: बॉक्स ऑफिसवर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘मडगांव एक्सप्रेस’ या दोन्ही चित्रपटांनी पहिल्या विकेंडला दिलासादायक कमाई केलेली दिसत आहे.
Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 3 Box Office Collection
Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 3 Box Office CollectionSaam Tv

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 3 Box Office Collection

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडेचा (Randeep Hooda And Ankita Lokhande) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie) आणि प्रतीक गांधीचा ‘मडगांव एक्सप्रेस’ (Madgaon Express Movie) हे दोन्हीही चित्रपट नुकतेच थिएटरमध्ये रिलीज झालेले आहेत.

तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. वेगवेगळ्या धाटणीचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. दोन्ही चित्रपटांकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची सुरुवात संथ गतीने झालेली पाहायला मिळाली. पण असं असलं तरीही दोन्ही चित्रपटांची पहिल्या विकेंडला दिलासादायक कमाई केलेली दिसत आहे. जाणून घेऊया, चित्रपटाच्या कमाईबद्दल... (Bollywood)

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 3 Box Office Collection
विश्वासार्ह लोकसेवक बनण्यास मी उत्सुक, Kangana Ranaut ने भाजपकडून तिकीट मिळताच मानले आभार

२२ मार्चला रिलीज झालेल्या रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची पहिल्या विकेंडला उत्तम कमाई होताना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्या विकेंडमध्ये जेमतेम ६ कोटींचीच कमाई केलेली आहे. शुक्रवारी चित्रपटाने १ कोटी, शनिवारी २.२५ कोटी आणि रविवारी २.६० कोटींची कमाई केलेली आहे. तीन दिवसांतील ही कमाई सुरू असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला दिलासादायक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, रणदीप, अंकितासोबतच या चित्रपटामध्ये अमित साई, आर भक्तीसह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रणदीप हुड्डानेच स्वत: केली आहे. (Bollywood Film)

तर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासोबतच कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपट देखील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अनिवाश तिवारी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या विकेंडमध्ये ७ कोटींची कमाई केली आहे. दोन्हीही चित्रपटांच्या कमाईमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या विकेंडमध्येही प्रतिक गांधीच्या ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटाने रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला मागे टाकले. (Bollywood News)

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 3 Box Office Collection
Shraddha Kapoor आणि Rahul Modi यांचं रिलेशनशीप कन्फर्म, दोघांच्याही कुटुंबीयांना आवडली जोडी

‘मडगाव एक्सप्रेस’ हा चित्रपट कुणाल खेमूचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अनिवाश तिवारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही, मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री छाया कदमही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  (Entertainment News)

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 3 Box Office Collection
Priya Bapat: तो माझ्यासमोर आला आणि त्याने..., प्रिया बापटने सांगितला तिच्यासोबत घडलेला भयानक प्रसंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com