Chetan Bodke
९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या अभिनयापासून दुर आहे. तिच्या अभिनयाची कमी पण तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होते.
करिश्मा कपूर कायमच सोशल मीडियावर वेगवेगळे आऊटफिट्स वेअर करीत चाहत्यांसोबत हटक्या फॅशनमधील फोटो शेअर करते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मल्टीकलरची साडी वेअर करत तिने खूप सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सिंपलनेसने सर्वांचेच लक्ष वेधले.
स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर करत अभिनेत्रीने संपूर्ण लूक केला आहे. त्यासोबतच सिंपल हेअर स्टाईल केलेली दिसत आहे.
अभिनेत्रीने मल्टीकलर साडीचा लूक फिल्मफेअर अवॉर्ड्स साठी केला होता.
करिश्मा कपूरने बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले. सोशल मीडियासह सर्वत्रच तिचा मोठा फॅन्सक्लब आहे.
करिश्मा कपूरचा २००६ मध्ये ‘मेरे जीवन साथी’ हा शेवटचा चित्रपट आहे.
करिश्माने ‘मदरहुड’ या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केलं आहे.