Chetan Bodke
टेलिव्हिजन सिरियलपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.
तिच्या दमदार अभिनयामुळे आणि हटक्या फॅशनमुळे कायमच मृणालचे चाहते लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव घेतलं जातं.
गेल्या काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२३' चा कार्यक्रम सोहळा पार पडला, यावेळी फक्त मराठी सिनेसृष्टीतीलच नाही तर, बॉलिवूडमधील कलाकारांनीही उपस्थिती लावली होती.
मृणालने प्रिंटेड ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधले.
मृणालच्या या ड्रेसवर वेगवेगळ्या डिझाईन्सचे फुलंही ड्रेसवर पाहायला मिळत आहे.
या लूकवर मृणालने ग्लॉसी मेकअप केलेला असून खूप सुंदर पद्धतीने फोटो पोजेस दिलेल्या आहेत.
कोणतीही फॅशन असो, अगदी व्यवस्थित रित्या मृणाल फॅशन करते.
मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
मृणालच्या या खास पोस्टवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.