RC 17 Movie : होळीच्या दिवशी राम चरणने दिलं सरप्राईज; केली नव्या चित्रपटाची घोषणा

Ram Charan : राम चरणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलीय. रंगांच्या उत्सवानिमित्त राम चरणने पुष्पा दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत नवीन चित्रपटाची घोषणा केलीय. दरम्यान सोशल मीडियावर अभिनेता राम चरण आणि दिग्दर्शकाचा फोटो व्हायरल झालाय.
Ram Charan
Ram Charan

RC 17 Ram Charan Upcoming Movie :

होळीच्या दिवशी राम चरणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करून त्यांने चाहत्यांचा आनंद द्विगुणित केलाय. होळीच्या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. राम चरणने काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरसोबत त्याचा आगामी चित्रपट आरसी 16 चे शूटिंग सुरू केलं. या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. राम चरण तो त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान अभिनेत्याने त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केलीय. (Latest News)

राम चरण सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत काम करणार आहे. सुकुमार यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा' दिग्दर्शित केलाय. ते सध्या अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चे शूटिंग करत आहे. आता राम चरण देखील सुकुमारसोबत करणार असल्याने त्याचा येणारा नवी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असा कावयास बांधला जात आहे.

राम चरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळीच्या शुभेच्छा देताना आगामी चित्रपट आरसी 17 ची घोषणा केली. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये राम आणि सुकुमार यांच्या चेहऱ्याला रंग लागलेला दिसला. दुसऱ्या छायाचित्रात आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. राम चरणने या फोटोला एक कॅप्शनही दिले आहे, "RC 17. फोर्सेस पुन्हा एकत्र आलेत, असं कॅप्शन रामने दिले आहे.

आरसी 17 चे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. सुकुमार चित्रपटाची कथा लिहित आहेत. मैत्री मूव्ही मेकर्स प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. राम चरण आणि सुकुमार एकत्र काम करण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी दोघांनी २०१८ मधील सुपरहिट चित्रपट रंगस्थलममध्ये एकत्र काम केले होते.

RC 17 व्यतिरिक्त राम चरण कियारा अडवाणीसोबत गेम चेंजर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. तर नवा चित्रपट आरसी १७ मध्ये त्याच्यासोबत जान्हवी कपूर दिसणार आहे.

Ram Charan
Shraddha Kapoor आणि Rahul Modi रिलेशनशिपमध्ये? श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com