Bhau Kadam : अभ्यास कर, माझं लग्न झालंय; खरंच भाऊ कदमने प्रतिक्रिया दिली आहे का?

Bhau Kadam News : चाहतीचा पोस्टवर अभिनेता भाऊ कदमने कमेंट केली आहे. पण खरंच ही कमेंट भाऊ कदमने केली आहे का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.
Bhau Kadam
Bhau KadamSaam tv

Bhau Kadam reply to fan :

एखादी गोष्ट हवी असेल तर लहान मुलं त्यांच्या आई-वडिलांकडे रडून रडून हट्ट करतात. अनेकदा हट्टी मुले त्यांच्या आई-वडिलांनी हट्ट पूर्ण करावेत, यासाठी जेवण किंवा अभ्यास करणेही सोडतात. जेवण किंवा अभ्यास करणे सोडल्यावर या मुलांचा हट्ट आई-वडिलांना पूर्ण करावा लागतो. त्याचप्रमाणे आता चाहतेही त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींकडे हट्ट करू लागले आहेत. काही सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांचे हट्ट पूर्ण करताना दिसताहेत, तर काही सेलिब्रिटी दुर्लक्ष करत आहेत. अशाच एका चाहतीचा पोस्टवर अभिनेता भाऊ कदमने कमेंट केली आहे. पण खरंच ही कमेंट भाऊ कदमने केली आहे का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे. (Latest Marathi News)

देशभरात तरुणाईमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. तरुणाईमध्ये इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मचा वापर अधिक आहे. या इन्स्टाग्रामवर प्रत्येक दिवसांला अनेक विषय ट्रेंड होतात. एखादा विषय ट्रेंड होऊ लागल्यानंतर तरुणाईंकडून त्याचं अनुकरण केलं जातं. यामुळे तुम्ही इन्स्टाग्राम सुरु केल्यानंतर एकच ट्रेंड दिसतो. अशा ट्रेंडची काही जणांकडून खिल्ली देखील उडवली जाते. एखादा विषय ट्रेंड होत असेल, तर काही युजर्स पटकन त्यावर पोस्ट करतात. अशाच एका ट्रेंडची जोरदार चर्चा होत आहे.

Bhau Kadam
Taapsee Pannu Wedding: तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न; लवकरच मुंबईत रिसेप्शन पार्टी

काय आहे ट्रेंड?

इन्स्टाग्रामवर चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना त्यांच्या पोस्ट किंवा फोटोंवर कमेंट करण्याचा हट्ट करत आहेत. चाहते सेलिब्रिटींना टॅग करून कोणी म्हणत आहे की, मी अभ्यास करणार नाही, कोणी म्हणतंय की जेवण करणार नाही. तर काही जण म्हणत आहेत की, मी कॉलेजला जाणार नाही'.

चाहत्यांकडून सेलिब्रिटींना टॅग करून व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट केले जात आहेत. या चाहत्यांच्या पोस्टवर युजर्स देखील शेकडो कमेंट्स करत आहेत. भाऊ कदमची चाहती ज्योती खैरेने पोस्ट करत म्हटलं की, 'जर भाऊ कदम यांनी या Reels वर कमेंट केली तर मी उद्यापासून अभ्यास करेन'.

Bhau Kadam
Aishwarya Sharma : मी प्रेग्नंट नाही! ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टच सांगितलं

चाहतीच्या पोस्टवर भाऊ कदमने मजेशीरपणे म्हटलं की, 'अभ्यास कर, नको माझ्या नादा लागू. माझं लग्न झालंय'. मात्र, भाऊ कदम नावाच्या फॅन पेजने ही कमेंट केली आहे. हे भाऊ कदमचं अधिकृत अकाऊंट नाही. मात्र, अनेकांना ते भाऊ कदमने कमेंट केल्याचं वाटलं. खरंतर ती भाऊ कदमची कमेंट नाही. त्या कमेंटला चार हजारांहून अधिक जणांनी लाईक्स मिळाले आहेत.

या चाहतीच्या पोस्टवर एका युजर्सने म्हटलं की, 'भाऊ नावाचा मित्र आहे माझा.. दुसरा कदम नावाचा आहे. त्या दोघांनी कमेंट केली तर चालेल का'. या चाहतीच्या कमेंट्सला ९ हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेट्स आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com