Why Aamir Khan Called Mr. Perfectionist Saam TV
मनोरंजन बातम्या

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

Aamir Khan In The Great Indian Kapil Show : खुद्द आमिर खाननेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे नाव कसं पडलं ? याबाबतचा खुलासा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये केलेला आहे.

Chetan Bodke

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist

‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून आमिर खानची सर्वत्र ओळख आहे. पण नेमकं त्याला ही ओळख कशी मिळाली ? ही गोष्ट अनेकांना माहित नाही. खुद्द अभिनेत्यानेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे नाव कसं पडलं ? याबाबतचा खुलासा त्याने ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये केलेला आहे. यावेळी शोमध्ये अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते उलगडलेली आहेत.

आमिर खानने स्वत:च सांगितले की, " मला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’ हा टॅग ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिलेला आहे. मी तेव्हा बॉलिवूडमध्ये नवीन होतो. मी दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या 'दिल' चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि त्या चित्रपटाचे कॅमेरामन बाबा आझमी होते. तर त्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी आम्ही कधी कधी बाबा आझमी यांच्या घरी जायचो. तर एकदिवशी मी आणि स्वत: बाबा आझमी त्यांच्या घरी कोणत्या तरी विषयावर चर्चा करत होतो. " (Bollywood)

मुलाखतीमध्ये आमिरने पुढे सांगितले की, "त्यावेळी मला शबाना आझमी यांनी चहा विचारला. त्यांनी मला चहा देताना विचारलं की, "आमिर तु चहामध्ये साखर किती घेशील ?" आम्ही दोघेही बोलण्यामध्ये इतके व्यग्र होतो की, त्यांनी मला प्रश्न काय विचारला तेच मला कळलं नाही. त्यांचा प्रश्न मला कळण्यापर्यंत अवघे काही सेकंद लागले. त्यांचा प्रश्न मला कळल्यावर शबाना यांना 'कप किती मोठा आहे?'आणि नंतर 'चमचा किती मोठा आहे?' असा प्रश्न विचारला. मग त्यांना मी कपाप्रमाणे आणि चमच्याप्रमाणे व्यवस्थित साखर टाकायला सांगितले. तेव्हापासूनच मला सर्वत्र ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’ हा टॅग मिळाला आहे." (Bollywood News)

दरम्यान, आमिर खानच्या कामाविषयी बोलायचे तर, खुद्द आमिर 'लाहोर 1947' चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ज्याचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिकेत, सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल आणि अली फजल मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर अभिनेता म्हणून आमिर खान 'तारे जमीन पर'चा सिक्वेल असलेल्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात तो दिसणार आहे. चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूजाही दिसणार आहे. ख्रिसमस २०२४ च्या मुहूर्तावर आमिर खानचा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT