Kapil Sharma And Sunil Grover Show: ‘कपिल शर्मा शो’ नंतर कपिल- सुनील पुन्हा एकदा एकत्र दिसणार, आता टिव्हीवर नाही तर ओटीटीवर कॉमेडीचा जलवा दाखवणार

Kapil Sharma And Sunil Grover Upcoming Show: ‘द कपिल शर्मा शो’नंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kapil- Sunil Work Together In Upcoming Comedy Show
Kapil- Sunil Work Together In Upcoming Comedy ShowSaam Tv

Kapil- Sunil Work Together In Upcoming Comedy Show

‘द कपिल शर्मा शो’नंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही कारणास्तव त्यांच्यामध्ये वाद होता. पण अखेर त्या वादानंतर ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. खरंतर त्यांच्या फॅन्ससाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल. कपिल आणि सुनील दोघेही नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या शोमधून पुन्हा एकत्र येणार आहेत. दोघांचा एकत्र सेल्फी व्हायरल झाला आहे. (Bollywood)

Kapil- Sunil Work Together In Upcoming Comedy Show
Vijay Singh Revealed People Abuse: 'मला शिव्या दिल्या..', दोन वर्षांपासून बिग बॉसचा आवाज देणाऱ्या व्यक्तीला मिळताय धमक्या; नेमकं काय घडलं?

नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम पेजवर या शोचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या ह्या प्रोमोमध्ये, कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, अर्चना सिंह सह सर्वच चेहरे दिसत आहे. या व्हिडीओच्या शेवटी, “आता आमचं कुटुंब पूर्ण झालं.” असं कपिल शर्मा म्हणतोय. हा व्हिडीओ शेअर करताना नेटफ्लिक्सने, “दिल थाम के बैठिये, जिस घडी का इंतजार था, वो आगयी है...” अशा आशयाचं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. (The Kapil Sharma Show)

कपिल शर्माचा हा आगामी शो टिव्हीवर नाही तर ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगभरातील प्रेक्षकांसमोर ही कॉमेडी गँग परफॉर्म करणार आहे.

१३० देशांमध्ये कपिल शर्माचा हा शो टेलिकास्ट होणार आहे. कपिल- सुनीलला एकत्र पाहून फॅन्सला आनंद झाला आहे. आता हे दोघे पुन्हा एकत्र आलेय म्हटल्यावर कॉमेडीचा धमाका होणार यात शंका नाही.

अद्याप कपिलने प्रेक्षकांना या शोचे नाव सांगितले नाही. शो मध्ये कपिल शर्मासह कृष्णा अभिषेक, किकू शारदा, राजीव ठाकूर, अर्चना पुरण सिंग आणि सुनील ग्रोव्हर हे देखील सहभागी होणार आहेत. (Entertainment News)

Kapil- Sunil Work Together In Upcoming Comedy Show
Salaar Twitter Review: प्रभास इज बॅक! 'सालार'चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्याचा लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com