Jio Studios Event: नेटफ्लिक्स-अमेझॉनच्या टक्कर देणार जिओ स्टुडिओ; अंबानींच्या अॅपवर मोफत पाहता येणार सिनेमे आणि वेबसीरीज

Jio Studios announces content slate: Jio Studios आता OTT च्या जगात देशांतर्गत मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे.
Jio Studios announces content slate
Jio Studios announces content slateTwitter
Published On

Jio Studios Connect: जिओ मनोरंजनाचा जगतात पाऊल ठेवत आहे. त्यामुळे आता मनोरंजन विश्वास देखील क्रांती पाहायला मिळणार हे निश्चित. जिओ सिनेमा हे ओटीटी प्लँटफॉर्म सुरु झाले आहे. तर सध्या जिओ सिनेमावर टाटा आयपीएलचा सर्वजण आनंद घेत आहे.

लवकरच या ओटीटी प्लँटफॉर्मवर प्रेक्षकांना वेबसीरीज आणि चित्रपट पाहायला मिळणार आहेत. तर आता जिओने Jio Studios आपल्या भेटीला येत आहे. तसेच जिओ स्टुडिओने 100 प्रोजेक्ट्सच्या घोषणेसह याची सुरुवात केली आहे.

बुधवारी जिओ स्टुडिओने घोषणा केली की ते येत्या काही दिवसांत १०० चित्रपट आणि वेबसीरीज घेऊन येत आहेत. अनेक मालिका आणि चित्रपटांची झलकही दाखवण्यात आली. यामध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. मोठमोठी स्टारकास्ट आणि धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरीज यांच्या लाइनअपमुळे सर्वांचे लक्ष तिकडे गेले आहे. याशिवाय प्रादेशिक भाषांमध्येही कन्टेन्ट देण्याचे आश्वासन दिले आहे.

Jio Studios announces content slate
Satish Kaushik's Birth Anniversary: सर्वांना हसवणाऱ्या सतीश कौशिक यांच्या जीवनातील कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

Jio Studios आता OTT च्या जगात देशांतर्गत मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत फक्त OTT प्लॅटफॉर्म जसे Netflix, Amazon Prime Video, Hotstar आणि G5 भारतात लोकप्रिय आहेत. Jio Studios या प्लॅटफॉर्मशी थेट स्पर्धा करण्याच्या प्रक्रियेत आहे.

Jio Studios त्याच्या OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema द्वारे विनामूल्य किंवा अतिशय स्वस्त दरात कन्टेन्ट उपलब्ध होणार आहे. सध्या हे प्लॅटफॉर्म जिओ वापरकर्त्यांसाठी मोफत आहे. त्यात अजून बरेच चित्रपट पाहता येणार आहेत. परंतु ओटीटीवरील मोठ्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी कन्टेन्ट अद्याप नाही. अशा परिस्थितीत ही मोठी घोषणा सर्व मोठ्या OTT साठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.येत्या काही दिवसांत एक नवीन OTT अॅप देखील लॉन्च केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Netflix आणि Amazon सारखे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म सर्व लोकांपर्यंत पोचलेले नाही. पण जिओ स्टुडिओला ही समस्या येणार नाही. जिओचे सिम असलेल्या प्रत्येक फोनमध्ये जिओचे अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मोठ्या वर्गापर्यंत सहज पोहोचण्याची क्षमता जिओमध्ये आहे.

पहिल्या बॅचमध्येच 100 प्रोजेक्ट्सची घोषणा करून, Jio ने दाखवून दिले आहे की तो OTT मार्केटमध्ये एक मोठा गेम बनवणार आहे. पण प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ही आहे की त्यांच्यासमोर नवीन मालिका आणि चित्रपटांची मोठी लाईन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com