Siddhant Chaturvedi Birthday : बॉलिवूडच्या 'गली बॉय'चा आज वाढदिवस; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आहे कोट्यवधींचा मालक

Siddhant Chaturvedi Net Worth : "गली बॉय", "गेहरांईया" आणि "बंटी और बबली २" या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सिद्धांत चतुर्वेदीचा आज वाढदिवस आहे. त्याने अल्पावधीतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
Siddhant Chaturvedi Net Worth
Siddhant Chaturvedi Net WorthInstagram

Siddhant Chaturvedi Net Worth

"गली बॉय", "गेहरांईया" आणि "बंटी और बबली २" या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सिद्धांत चतुर्वेदीचा आज वाढदिवस आहे. सिद्धांत चतुर्वेदीचा जन्म २९ एप्रिल १९९३ रोजी झालेला आहे. तो आज आपल्या फॅमिलीसोबत ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. उत्तर प्रदेशमधील बलियामध्ये सिद्धांतचा जन्म झाला आहे. सिद्धांत पाच वर्षाचा असताना तो आपल्या आई- वडीलांसोबत मुंबईमध्ये आला होता. त्याचे वडील पेशाने सीए होते. त्यामुळे सिद्धांतलाही सीए व्हायचे होते. पण त्याला अभिनयामध्ये आवड होता. आज त्याची बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते.

Siddhant Chaturvedi Net Worth
Tamannaah Bhatia Today Inquiry : तमन्ना भाटियाची महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुंबईमधील मीठीबाई कॉलेजमध्ये त्याने अकाऊंटचं शिक्षण घेतले होते. आपल्यासारखंच सिद्धांतनेही सीए बनावं सीए बनावं अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती. पण सिद्धांतचं सीए आर्टिकलशिप दरम्यान कामामध्ये मन लागत नव्हतं. त्यामुळे त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये "फ्रेश फेस" स्पर्धेत सिद्धांतनं भाग घेतला होता. या स्पर्धेत तो विजेता ठरला. २०१६ मध्ये सिद्धांतने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. "लाइफ सही है" आणि "इनसाइड एज" या वेबसीरिजमध्ये तर "गली बॉय", "गेहरांईया" आणि "बंटी और बबली" या चित्रपटात त्याने काम केलं आहे.

आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला सिद्धांत आज कोट्यवधींचा मालक आहे. ५ मिलियन डॉलरपेक्षा अधिक सिद्धांतचं नेटवर्थ असून ३ ते ४ कोटी रुपये इतकं त्याचं वार्षिक उत्पन्न आहे. सिद्धांत त्याच्या कुटुंबासोबत एका लग्झरी फ्लॅटमध्ये राहतो. त्याला अनेक महागड्या कार्सची आवड आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांतकडे एकूण ४० ते ४५ कोटींची संपत्ती असून तो एका चित्रपटासाठी १.५ कोटी इतके मानधन घेतो. "खो गये हम कहाँ" या वेब फिल्ममध्ये सिद्धांत शेवटचा दिसला होता. सध्या चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे. (Entertainment News)

Siddhant Chaturvedi Net Worth
TRP Rating Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला; पहिल्या क्रमाकांवर कोणती मालिका?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com