ICAI CA May 2024 Exams Postponed: लोकसभा निवडणुकांमुळे सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात माेठा बदल, मंगळवारी हाेणार जाहीर

Lok Sabha Election 2024 : आयसीएआयने देशभरातील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाली.
icai ca may 2024 exams postponed revised schedule to be released on 19 march
icai ca may 2024 exams postponed revised schedule to be released on 19 marchsaam tv

- अक्षय बडवे

Pune :

आगामी काळात हाेणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (lok sabha election 2024) द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स ऑफ इंडियाने (the institute of chartered accountants of india) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षेबाबतचे नवे वेळापत्रक उद्या (ता.१९ मार्च) प्रसिद्ध केले जाणार आहे. (Maharashtra News)

शनिवारी लाेकसभेचे बिगुल वाजले. यंदा प्रथमच देशपातळीवर लाेकसभा निवडणुक सात टप्प्यात हाेणार आहे. महाराष्ट्र राज्यात ही निवडणुक पाच टप्प्यात हाेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेेळ्या संस्थांच्या नियाेजित कार्यक्रमांत बदल हाेऊ लागले आहे. यामध्ये परीक्षांचा देखील समावेश आहे.

icai ca may 2024 exams postponed revised schedule to be released on 19 march
लाेकसभा निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच समाज माध्यमात 7 ची धूम; 7 टप्पे, 7तारा, 7 मे, 007 उदयनराजे

या निवडणुकांमुळे सीए परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. आयसीएआयने याबाबत उद्या (मंगळवार, ता. 19 मार्च) नव्या तारखा जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यापूर्वीचा परीक्षेचा कार्यक्रम रद्द

इंटरमिजिएट गट एक 3, 5 आणि 7 मे.

इंटरमिजिएट गट दोन 9, 11 आणि 13 मे.

सीए अंतिम गट एक परीक्षा 2, 4 आणि 6 मे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीए अंतिम गट दोन 8 , 10 आणि 12.

फाउंडेशन परीक्षा 20, 22, 24 आणि 26 जून.

आता उद्या नव्याने तारखा जाहीर केल्या जाणार.

Edited By : Siddharth Latkar

icai ca may 2024 exams postponed revised schedule to be released on 19 march
Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचं मुलाने केले साेनं, 'खेलाे इंडिया' त राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकावर काेरलं नाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com