- अजय सोनवणे
मनमाड (manmad news) येथील भंगार विक्रेत्याच्या मूलाने खेलाे इंडिया क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टींग खेळात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. खेळाची आवड असलेल्या साईराज परदेशी (sairaj pardeshi) याने प्रतिकूल परिस्थिती असतानाही कष्टाने, जिद्द बाळगत मिळविलेले यश कुटुंबासह मनमाडकरांना सुखावून गेले आहे. (Maharashtra News)
चेन्नई येथे सुरू असलेल्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये रविवारी छत्रे विद्यालयाच्या साईराज राजेश परदेशी (sairaj pardeshi son of a scrap dealer sets youth national record in weightlifting) याने १२४ किलो स्नॅच १६१ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत क्लिन जर्क मध्ये १६२ किलो वजन उचलून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सुवर्णपदक पटकावले. यावेळी महाराष्ट्रातील खेळाडूंनी जल्लाेष केला.
मागील वर्षी इंदोर येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत साईराजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु या वर्षी जिद्दीने सराव करीत सुवर्णपदक प्राप्त केले. साईराज छत्रे विद्यालयात अकरावीत शिकत आहे. मागील महिन्यात ईटानगर येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व जूनियर स्पर्धेत साईराजने एक सुवर्ण, एक रौप्यपदक मिळवित चांगली कामगिरी बजावली पण राष्ट्रीय विक्रम हुकल्याची खंत त्याने या स्पर्धेत भरून काढली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जय भवानी व्यायामशाळेचा खेळाडू असलेला साईराज सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (संभाजीनगर) येथे प्रशिक्षण घेत आहे. साईराज यास छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.