Rupali Bhosale Brought New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rupali Bhosale : स्वप्नपूर्ती! अभिनेत्री रुपाली भोसलेने मुंबईत घेतलं हक्काचं घर, दणक्यात केली वास्तुशांती

Rupali Bhosale Brought New Home : घराचं स्वप्न उराशी बाळगत रुपाली भोसलेने मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या नव्या घराची वास्तुशांती पार पडली.

Chetan Bodke

मुंबई शहराला मायानगरी नावाने ओळखले जाते. या मायानगरीमध्ये प्रत्येक जण आपलं स्वप्न घेऊन येत असतो. सेलिब्रिटींसह प्रत्येकजण आपले हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहत असतात. अशातच अभिनेत्री रुपाली भोसले हिनेही आपलं स्वप्न पूर्ण केले आहे. घराचं स्वप्न उराशी बाळगत रुपाली भोसलेने मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. अभिनेत्रीने स्वत:साठी घर खरेदी केलं असून सध्या तिच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या नव्या घराची वास्तुशांती पार पडली.

रुपाली भोसलेच्या घराच्या वास्तुशांतीचे फोटो आणि व्हिडिओ राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीच्या घरातील इंटिरीयरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीने आपल्या घरामध्ये सिनेकरियरमध्ये मिळालेले पुरस्कार ठेवलेले दिसत आहे. त्यासोबतच विठ्ठल - रखुमाई, छत्रपती शिवाजी महाराज, श्री- कृष्ण बासरी वाजवताना अशा वेगवेगळ्या मुर्ती तिने घरात ठेवलेली दिसत आहे. अभिनेत्रीच्या घराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रुपालीच्या घराच्या नेमप्लेटनेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिने आपल्या घरातील सर्वच सदस्यांचे नाव लिहिलेले दिसत आहे. तिने नेमप्लेटवर प्रकाश प्रज्ञा संकेत भोसले असं लिहिलेले दिसत आहे. तर पुढे तिने तिचा रुम नंबरही लिहिलेला दिसत आहे. रुपालीच्या नव्या घराच्या वास्तुशांतीला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरील स्पष्ट आनंद दिसून येत होता. वास्तुशांतीवेळी अभिनेत्रीने खास साडी नेसली होती, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अद्याप रुपालीने घरातले इनसाईड फोटो शेअर केलेले नाहीत. सध्या तिचे चाहते घराचे इनसाईड फोटो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT