Sonu Sood Fan: सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याची १५०० किमीची दौड, गाठली मायानगरी

Sonu Sood Fan Ran From Mumbai To Delhi: सोनू सूदला भेटण्यासाठी त्याचा चाहता थेट १५०० किमी धावत मुंबईला आला आहे.
Sonu Sood Fan Ran From Mumbai To Delhi To Meet Him
Sonu Sood Fan Ran From Mumbai To Delhi To Meet HimSaam Tv

बॉलिवूडचा मसिहा सोनू सूद सोशल मीडियावर आपल्या अभिनयामुळे नाही तर सामाजिक कार्यामुळे कायमच चर्चेत असतो. सोनू सूद अनेकदा चाहत्यांसाठी ‘एक हात मदतीचा’ देत त्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्याने कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करत देवदूत झाला होता. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सोनू सूदला भेटण्यासाठी नेहमीच अनेक चाहते येत असतात. पण अभिनेत्याला भेटण्यासाठी थेट १५०० किमी धावत मुंबईला आला आहे. सध्या सोशल मीडियावर सोनू सूदचा आणि त्याच्या चाहत्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Sonu Sood Fan Ran From Mumbai To Delhi To Meet Him
OTT Release This Week : ‘हीरामंडी’, ‘शैतान’, ‘क्रु’; या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका, कुठे आणि कधी पाहता येणार ?

सोनू सूदचा चाहता हा दिल्लीहून मुंबईमध्ये १५०० किमी धावत आला आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, आपल्या लाडक्या कलाकाराच्या प्रेमापायी महेशने इतका मोठा पल्ला गाठला आहे. दिल्लीच्या इंडिया गेट पासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत त्यानेही रेस केलेली आहे. आवडत्या कलाकाराप्रती फॅन्सचे किती प्रेम आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सोनूचा आणि त्याचा चाहता महेशचा हा फोटो विरल भयानी या पापाराझी पेजने शेअर केलेला आहे.

सोनू सूदने आपल्या चाहत्याला नाराज केलेले नाही. तो त्याच्या चाहत्याला भेटला. या क्रेझी फॅन आणि सोनू सूदचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी त्याने पांढरा टी- शर्ट घातला आहे. त्याच्या टी- शर्टवर लिहिले की, "इंडिया गेट (दिल्ली) ते गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) रन - 1500 किमी..." असं लिहिलेलं आहे.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे तर, सोनू सध्या ॲक्शन-थ्रिलर 'फतेह' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या सामाजिक कामासोबत त्याच्या आगामी चित्रपटासाठीही तो काम करीत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सोनू दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'फतेह' चित्रपटाचे कथानक सायबर क्राईमच्या भीषणतेवर भाष्य करणारा आहे.

Sonu Sood Fan Ran From Mumbai To Delhi To Meet Him
Karmaveer Bhaurao Patil Biopic : कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन रुपेरी पडद्यावर पाहता येणार, 'कर्मवीरायण' चे पोस्टर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com