OTT Releases This Week: ‘हीरामंडी’, ‘शैतान’, ‘क्रु’; या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका, कुठे आणि कधी पाहता येणार ?

New OTT Releases Movies And Web Series (29 April To 5th May): ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. यंदाचा वीकेंड सिनेप्रेमींसाठी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
OTT Release This Week (29 April To 5th May)
OTT Release This Week (29 April To 5th May)Saam Tv

ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या धाटणीचे वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movies) रिलीज होत असतात. यंदाचा वीकेंड सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे, कारण वीकेंडला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होत आहेत, जाणून घेऊया...

Heeramandi Web Series Poster
Heeramandi Web Series PosterInstagram @netflix_in

हिरामंडी (Heeramandi)

संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' वेबसीरीजची (Heeramandi) सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. ही वेबसीरीज येत्या १ मे ला 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटीवर रिलीज होणार आहे.

भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामा असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर या वेबसीरीजचे कथानक आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची जीवनशैली आणि देशाच्या स्वातंत्र्यादरम्यानचा त्यांचा संघर्ष संजय लीला भन्साळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Shaitaan Movie Poster
Shaitaan Movie PosterInstagram

शैतान (Shaitaan)

अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ह्या 'शैतान' चित्रपटाला प्रेक्षकांकडून बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने एकूण १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट येत्या ३ मे ला 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

The Broken News 2 Movie Poster
The Broken News 2 Movie PosterSaam Tv

द ब्रोकन न्यूज २ (The Broken News 2)

सोनाली बेंद्रे आणि श्रिया पिळगांवकर स्टारर 'द ब्रोकन न्यूज २' येत्या ३ मे ला झी ५ (Zee 5) या ओटीटीवर रिलीज झालेला आहे. विनय वायकुळ दिग्दर्शित चित्रपटात प्रमुख भूमिकेत, श्रिया पिळगांवकरसह सोनाली बेंद्रे आणि जयदीप अहुलावत आहे.

Crew Movie Poster
Crew Movie PosterSaam Tv

क्रु (Crew)

करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर 'क्रू' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केल्यानंतर हा चित्रपट मे २०२४ मध्ये 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Patna Shuklla
Patna ShukllaSaam Tv

पटना शुक्ला (Patna Shuklla)

रविना टंडन स्टारर 'पटना शुक्ला' चित्रपट २९ मार्चला 'डिज्ने प्लस हॉटस्टार' (Disney Plus Hotstar) रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोर्ट रुमा ड्रामावर आधारित असून चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com