Telangana Crime Saam Tv
क्राईम

Crime: सोनमपेक्षा भयंकर! आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंड, लग्नानंतर ३० दिवसांत तरुणीने नवऱ्याला संपवलं

Telangana Crime: तेलंगणामध्ये राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणासारखीच घटना घडली. याठिकाणी एका तरुणीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात तरुणीची आई आणि बॉयफ्रेंड देखील सहभागी होता.

Priya More

इंदुरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. राजाची बायको सोनमनेच त्याची हत्या केली. ही घटना ताजी असतानाच देशात आणखी एक अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. सोनमपेक्षा भयंकर अशी ही तरुणी आहे. तिने आपली आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने लग्नाच्या एका महिन्यातच नवऱ्याला संपवल. चाकूने सपासप वार करत नवऱ्याची हत्या करण्यात आली आणि मृतदेह फेकून देण्यात आला होता. या घटनेमुळे तेलंगणात खळबळ उडाली आहे.

तेलंगणातील कुर्नूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका नवविवाहित महिलेने आपल्या नवऱ्याची क्रूर हत्या केली. या हत्याकांड प्रकरणात नवविवाहित महिला, तिची आई आणि बॉयफ्रेंड यांचा सहभाग आहे. महत्वाचे म्हणजे आरोपी महिला आणि तिच्या आईचे एकाच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातूनच नवविवाहितीने नवऱ्याची हत्या केली. नवऱ्याची हत्या केलेली महिला, तिची आई यांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांचा बॉयफ्रेंड फरार आहे.

तेजेश्वर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तेजेश्वरच्या कुटुंबाने १३ फेब्रुवारी रोजी कुर्नूल येथील ऐश्वर्या या तरुणीशी त्याचे लग्न ठरवले होते. तेव्हापासून हे सर्वकाही व्यवसथित सुरू होते. पण लग्नाच्या ५ दिवस आधी ऐश्वर्या गायब झाली. ती कुर्नूलमधील एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेल्याची अफवा पसरली होती. पण ती १६ फेब्रुवारी रोजी परत आली आणि तिने दावा केला की ती एका मैत्रिणीच्या घरी गेली होती. कारण तिच्या आईवर हुंड्याची व्यवस्था करण्यासाठी दबाव होता.

त्यानंतर ऐश्वर्याने तेजेश्वरला तिच्या प्रेमाची खात्री दिली. त्यानंतर त्यांनी १८ मे रोजी लग्न केले. लग्नानंतर लगेचच अडचणी सुरू झाल्या. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तेजेश्वरच्या लक्षात आले की ऐश्वर्या सतत फोनवर बोलते आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही. १७ जून रोजी तेजेश्वर अचानक गायब झाला. त्याच्या भावाने पोलिस ठाण्यात धाव घेत तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली.या प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी या प्रकरणात सुरूवातीला ऐश्वर्यासह सर्वांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान, ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांनी कबूल केले की त्या दोघींचेही एकाच बँक कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध होते. सुजाता ही त्याची दीर्घकाळची जोडीदार होती आणि नंतर ऐश्वर्या देखील या नात्यात आली. कॉल डेटा रेकॉर्डवरून असे दिसून आले की लग्नानंतरही ऐश्वर्या बँक कर्मचाऱ्याशी २००० पेक्षा जास्त वेळा बोलली होती. त्यामुळे तेजेश्वरसोबत काही तरी चुकीचे घडलं असल्याचा संशय पोलिसांना आला.

तेजेश्वरची मालमत्ता आणि ऐश्वर्यासोबतच्या त्याच्या सततच्या संबंधांना असलेला त्याचा आक्षेप हा या हत्येमागील हेतू असल्याचा पोलिसांना संशय आहे. ऐश्वर्याचा बॉयफ्रेंड असलेल्या बँक कर्मचाऱ्याने कंत्राट घेतल्यानंतर मारेकऱ्यांना कामावर ठेवले आणि त्यांच्यासोबत त्याचा ड्रायव्हरही पाठवला.

१० एकर जमिनीचा सर्व्हे करण्याच्या बहाण्याने मारेकऱ्यांनी तेजेश्वरला कारमध्येत बसवले. कारमध्येच त्यांनी चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह पन्यामजवळ फेकून दिला. पोलिसांनी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाताला अटक केली. हत्येत सहभागी असलेला त्यांचा बॉयफ्रेंड बँक कर्मचारी आणि इतर गुन्हेगारांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT