
बिहारमध्ये भयंकर घटना घडली. एकाची निर्घृण हत्या करत त्याचे गुप्तांग कापण्यात आले. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली. भाचीच्या लग्नासाठी ही व्यक्ती बिहारमधील आपल्या घरी आला होता. लग्न घरातून या व्यक्तीचे आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. या व्यक्तीचे गुप्तांग देखील कापून टाकण्यात आले. या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मधुबनी येथे ही घटना घडली. कतारमधून आपल्या भाचीच्या लग्नासाठी आलेल्या ४८ वर्षीय मोहम्मद अब्बास या व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही घटना जयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोरहिया येथे घडली. मारेकऱ्यांनी या व्यक्तीचे गुप्तांगही कापले. मृत अब्बास कोरहिया गावातील हरती टोलचा रहिवासी आहे. तो कतारमध्ये व्यवसायिक म्हणून काम करत होता. १५ दिवसांपूर्वी आपल्या भाचीच्या लग्नासाठी अब्बासगावी आला होता. या घटनेमुळे लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मोहम्मदचे ४ भाऊ आहेत आणि हे सर्वजण आखाती देशामध्ये व्यवसाय करतात. अब्बास आणि त्याचा आणखी एक भाऊ लग्नासाठी बिहारमध्ये आले होते.
अब्बासचा चुलत भाऊ मोहम्मद अकबरच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मुलीचे लग्न रविवारी होते. त्याआधी शनिवारी मिलादची मेजवानी होती. रात्री ९:१५ वाजता वीज खंडित झाली. त्यानंतर मोहम्मद अब्बास जेवणाच्या कार्यक्रमातून अचानक गायब झाला. शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या बांसवाडीच्या शेतात आढळला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, त्याचे कुणाशीही शत्रुत्व नव्हते. मारेकऱ्यांनी त्याची गळा चिरून हत्या केली आणि नंतर त्याचे गुप्तांग कापून तिथे फेकून दिला. हे दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अब्बासचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. स्टेशन प्रभारी अमित कुमार यांनी सांगितले की, सध्या हत्येचे कोणतेही कारण कळालेले नाही. परंतू वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. अब्बास यांच्या हत्येनेतर त्यांच्या भाचीचे लग्न थांबवण्यात आले आहे आणि घरात गोंधळाचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.