Crime News: चिकनच्या दुकानामागं लघवी अन् वाद टोकाला; मालकानं सुऱ्यानं भोसकून एकाला संपवलं

Chhatrapati Sambhajinagar Crime News: मुकुंदवाडीतील चिकन शॉपजवळ लघवी केल्याच्या कारणावरून युवकाचा चाकूने खून; पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

चिकन शॉपजवळ लघवी केल्याच्या कारणावरून युवकाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही थरकाप उडवणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरातील कुरेशी चिकन शॉपजवळ घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दुकानमालकासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन संकपाळ आपला भाऊ आणि मित्रासह स्थानिक हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यानंतर कुरेशी चिकन शॉपमागे लघुशंका करण्यासाठी थांबले. त्यावेळेस दुकानमालक मस्तान कुरेशी त्या ठिकाणी पोहोचला. त्याने नितीन यांच्यावर आक्षेप घेत वादाला सुरूवात केली. वाद विकोपाला गेला आणि हाणामारीला सुरूवात झाली.

Crime News
Pune: पुणेकरांना सिंहगड रस्त्यावर आणखी महिनाभर वाहतुकीचा त्रास, ११८ कोटींचा उड्डाणपूल तयार होण्याच्या मार्गावर

संतापाच्या भरात कुरेशीनं मांस कापण्याचा चाकू घेतला आणि उपस्थित असणाऱ्या तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात नितीनचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोघे जण गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मस्तान कुरेशी, समीर खान, बाबर शेख, साजिद कुरेशी आणि नासिर खान यांचा समावेश आहे.

Crime News
Buldhana: वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती अन् लैंगिक अत्याचार; सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ..पती, सासू, नणंद अटकेत

पोलिसांनी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पाचही आरोपींना विशेष न्यायलयात हजर करण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्यांना जामीन मंजूर झाला असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com