Amravati Crime : कॅफेच्या आड अश्लील चाळे; २०० रुपयात मिळतोय एक तास, दामिनी पथकाच्या कारवाईत १३ जण ताब्यात

Amravati News : कॅफेच्या आड आंबट शौकीनांचा अड्डा चालविणाऱ्या काही कॅफेवर शहर पोलिसांनी मागील काही महिन्यांपूर्वी धडक कारवाई करून काही कॅफेला सील ठोकले होते. यानंतर पुन्हा कॅफेत मुलामुलींना जागा दिली जात आहे
Amravati Crime
Amravati CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: शहरात चालविल्या जाणाऱ्या सायबर कॅफेत मुला- मुलींना २०० रुपयात एक तासासाठी कॅबिनमध्ये जागा दिली जात असते. अर्थात या ठिकाणी येऊन अश्लील चाळे सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरच्या कारवाईत १३ युवक- युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

अमरावती शहरातील तीन कॅफेसह छत्री तलाव लगतच्या निर्जनस्थळी दामिनी पथकाने धाडी टाकून १३ युवक- युवतींना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याविरूध्द कारवाई करून मुलींना त्यांच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे शहरातील कॅफे चालकात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान कॅफेमध्ये २०० रुपात १ तास कॅबिनमध्ये तरुणांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात होती. 

Amravati Crime
Pune News : ८५ वर्षीय आजोबांना विवाहाची इच्छा; जाहिरात पाहून महिलेशी संपर्क, पण वरमाला पडण्यापूर्वीच झाली गफलत

तासनतास बसतात कॅफेच्या कॅबिनमध्ये 

कॅफेच्या आड आंबट शौकीनांचा अड्डा चालविणाऱ्या काही कॅफेवर शहर पोलिसांनी मागील काही महिन्यांपूर्वी धडक कारवाई करून काही कॅफेला सील ठोकले होते. परंतु कारवाई थांबल्यामुळे पुन्हा काही कॅफे चालकांकडून जागा देत युवक- युवतींचे अश्लिल चाळे सुरू झाले आहेत. तसेच काही कॅफे चालक युवक- युवतींना तासाप्रमाणे कॅबिन उपलब्ध करून देतात, याठिकाणी युवक- युवती कॅबिनमध्ये लाईट बंद करून तासन्तास बसतात. त्यांना काही ऑर्डरसुध्दा लागते, अशी माहिती आयुक्तालयातील भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांना मिळाली. 

Amravati Crime
Badlapur : बदलापुरातील 'सत्संग विहार'ला महसूल विभागाचा दणका; उल्हास नदीतील भरावाप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

१३ जणांना घेतले ताब्यात 

मिळालेल्या माहितीच्या आधारे दामिनी पथकाच्या मदतीने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लॅन्ड, फ्युजन बाईट, कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जनस्थळी धाडी घातल्या. या कारवाईत १३ युवक- युवतींना नको त्या अवस्थेत पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केली आणि ओळखपत्र घेऊन नोंद घेतली. या सर्वांविरूध्द पोलीस कारवाई करण्यात आली. तसेच युवतींच्या आई- वडिलांना बोलावून मुलींना त्यांच्या ताब्यात दिले. कारवाईमुळे शहरातील कॅफे चालकात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com