hinjewadi police arrests two along with whale fish vomit worth rs 3 crore 27 lakhs 60 thousand Saam Digital
क्राईम

Pune Crime News : 3 कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त,पुण्यात दोघांना अटक

hinjewadi police arrests two along with whale fish vomit : हिंजवडी पोलिसांनी वन्य जीव संरक्षण कायद्या अंतर्गत दाेघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पाेलिस कसून चाैकशी करत आहेत.

गोपाल मोटघरे

हिंजवडी पोलिसांनी व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पाेलिसांनी 3 कोटी 27 लाख 60 हजार बाजारमूल्य असलेली 3 किलो पेक्षा अधिक वजनाची व्हेल माश्याची उलटी जप्त केली आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरीहून काही तस्कर पुण्याच्या बावधन परिसरात व्हेल माश्याची उलटी विक्रीस घेऊन आले असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पाेलिसांनी तात्काळ हालचाली करत वनरक्षक सारिका दराडे यांना साेबत घेत संशयितांना पकडले. त्यानंतर पंच समक्ष संशयित आरोपी किशोर यशवंत डांगे आणि संदीप शिवराम कासार या दोघांना वन्य जीव संरक्षण कायद्या अंतर्गत हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान सुगंधी अत्तरामध्ये या उलटीचा वापर करण्यात येणार होता. ती पुढं कोणाला विकणार होते याबाबतचां तपास हिंजवडी पोलिस करत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॉ. विशाल हिरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT