Ratnagiri Dapoli Rain: अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद

Jamge Dev mountain road closed in Ratnagiri's Dapoli Area: मृद जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Ratnagiri Dapoli News: अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद
rain hits ratnagiri devacha dongar jamge road closedSaam Digital

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला. परिणामी दरडीचा काही भाग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराचा भाग खचू लागला आहे. यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे येत आहे. ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे.

रविवारी देखील दापोलीतील जामगे गावातील रस्ता खचला. या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणार्‍या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खचला. यामुळे रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.

Ratnagiri Dapoli News: अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद
जालना पाेलिसांची धडाकेबाज कामगिरी, 5 काेटींसाठी अपहरण झालेल्या मुलाची 6 तासांत केली सुटका, तिघांना अटक

दरम्या रत्नागिरी येथील खेड शहरात मंगळवारी दुमजली इमारत कोसळली. खेड शहरातील हमदुले चाळ येथे ही घटना घडली. खेड नगरपालीकेने धोकादायक इमारत म्हणून मे महिन्यात इमारत रिकामी केली हाेती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

Ratnagiri Dapoli News: अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद
Kolhapur News : शौमिका महाडिकांचा प्रस्ताव सतेज पाटील स्विकारणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com