shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh
shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadhSaam Digital

Kolhapur News : शौमिका महाडिकांचा प्रस्ताव सतेज पाटील स्विकारणार का?

shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून भाजपकडून अंमल महाडिकच निवडणूक लढवणार यावर सर्वजण ठाम असल्याचे शाैमिका महाडिक यांनी स्पष्ट केले.

- रणजीत माजगांवकर

गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात काेल्हापूरची महापालिका आहे. सत्ताधा-यांना शहराची हद्दवाढ करणे का जमले नाही असा सवाल भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केला. हद्दवाढीचे आम्ही समर्थन करतो परंतु हद्दवाढ कृती समिती मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार यामागे राजकारणाचा वास येत असल्याची टीका महाडिक यांनी केली. दरम्यान हद्दवाढ संदर्भात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे आवाहन महाडिक यांनी विराेधकांना केले आहे.

shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh
Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासन ताळ्यावर, आठवडाभरात नालेसफाईचे काम पूर्ण हाेणार, Video

शौमिका महाडिक म्हणाल्या हद्दवाढ विरोधी कृती समितीचा ही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. चर्चा करून हद्द वाढीचा प्रश्न सोडवला पाहिजे. जिल्ह्याचा विकासाची चर्चा करताना राजकीय भूमिका बाजूला ठेवणे आवश्यक आहे. चर्चेसाठी मी पुढाकार घेते. विराेधकांनी नागरिक म्हणून चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केले.

shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh
शांतताप्रिय साताऱ्यात नेमकं चाललंय तरी काय? Video Viral

दरम्यान महाडिक यांनी काँग्रेसच्या शहर प्रमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना कधी या प्रश्नावर काळा झेंडा दाखवला आहे का? गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आहे त्यांना हद्दवाढ जमली नाही? हे नागरिकांना देखील आता कळू लागल्याचे महाडिक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh
Samruddhi Mahamarg Accident : चालकाला डुलकी लागली अन् घात झाला, संभाजीनगरला निघालेल्या कारचा समृद्धी महामार्गावर अपघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com