Pune News : खेड शिवापुर टोल नाक्यावर १ कोटीचा मद्यसाठा जप्त, दाेघांना अटक

पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग यांचे कार्यालयामार्फत सुरू आहे.
goa liquor worth rs one crore seized at khed shivapur near pune
goa liquor worth rs one crore seized at khed shivapur near pune saam tv

- सचिन जाधव

Pune News :

राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्री करिता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने तब्बल १ कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. (Maharashtra News)

या पथकाने वाहनांच्या तपासणी दरम्यान एक जानेवारीस (New Year 2024) खेड शिवापुर टोल नाक्यावर संशयित वाहनांची तपासणी करत असताना संशयित कंटेनर (वाहन क्रमांक आरजे 30 जीए 3362) हा दहा चाकी कंटेनर थांबवून वाहन चालकांकडे वाहनांमध्ये काय आहे याबाबत चौकशी केली.

goa liquor worth rs one crore seized at khed shivapur near pune
Lonavala : लाेणावळ्यात पाेलिसांची आजही करडी नजर, तीन लाख 61 हजारांचा दंड वसूल

त्यांनी संशयितरित्या उत्तर दिल्याने वाहन बाजूला घेऊन तपासणी केले असता या वाहनामध्ये रंगाचे डबे दर्शनी बाजूस ठेवल्याचे आढळून आले. त्या रंगांच्या डब्याच्या पाठीमागे प्राथमिक अंदाजानुसार एक हजार पेक्षा जास्त मद्याचे बॉक्स असल्याचे आढळून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे मद्य फक्त गोवा राज्यात विक्री करता असलेले असून त्याची वाहनासह अंदाजे किंमत एक कोटी रुपये इतकी असल्याचे पथकाने माहिती दिली. वाहन चालकाकडे मद्य वाहतुकीचे संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाना अगर कोणतीही कागदपत्रे मिळून आलेले नाहीत असे पथकाने सांगितले.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेले आहे. याचा तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग यांचे कार्यालयामार्फत सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

goa liquor worth rs one crore seized at khed shivapur near pune
Satara : पालकमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य पाेलिसांनी घेतले गांभीर्याने, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गाेळीबार करणा-या युवकांची काढली वरात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com