Lonavala : लाेणावळ्यात पाेलिसांची आजही करडी नजर, तीन लाख 61 हजारांचा दंड वसूल

New Year 2024 : दुचाकीसह चार चाकी वाहनधारक पर्यटकांवर देखील दंडात्मक कारवाई झाली.
lonavala city police collects fine 3 lakh 61 thousand in two days
lonavala city police collects fine 3 lakh 61 thousand in two dayssaam tv
Published On

Lonavala News :

लोणावळा शहरात थर्टी फस्ट (31st december) व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 362 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी (lonavala city police) कारवाई केली आहे. आजही (साेमवार) लाेणावळा पाेलिस ठिकठिकाणी वाहन आणि वाहन चालकांची तपासणी करीत आहेत. (Maharashtra News)

लोणावळा शहर वाहतूक शाखेकडून दाेन दिवसांत तब्बल तीन लाख 61 हजार 300 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पाेलिसांकडून आजही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळाली. यामध्ये दुचाकीसह चार चाकी वाहनधारक पर्यटकांचा देखील समावेश आहे.

lonavala city police collects fine 3 lakh 61 thousand in two days
Ayodhya Ram Mandir: सव्वा दोन कोटी रामनाम जप पुस्तिका पाठविल्या जाणार अयोध्येला, नंदनगरीतील नागरिकांचा उपक्रम

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वाहतुकीस अडथळा, लायन्स जवळ न बाळगणे, नो एंट्री, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यासह दारू पिऊन वाहन चालविणे (drink and drive cases) अशा विविध नियमांचे पालन केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

lonavala city police collects fine 3 lakh 61 thousand in two days
Loksabha Election 2024: रविकांत तुपकरांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला, राजू शेट्टींकडून 'स्वाभिमानी'च्या सहा जागा जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com