life saved of vanchit bahujan aghadi secretary buldhana know the reason
life saved of vanchit bahujan aghadi secretary buldhana know the reasonSaam Digital

Vanchit Bahujan Aghadi : काळ आला हाेता पण...,गाेळीबारानंतरही वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी वाचला (पाहा व्हिडिओ)

life saved of vanchit bahujan aghadi secretary buldhana know the reason : या घटनेनंतर पाेलिसांची विविध पथके संशयित आराेपींच्या शाेधासाठी रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद भिसे यांच्या वाहनावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. वाहनाच्या काचेवर गाेळी लागल्याने माेठा अनर्थ टळला. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

ही घटना नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावर रात्री दहाच्या सुमारास घडली. प्रमोद भिसेंसह जळगाव जामोद वंचितचे तालुका अध्यक्ष सुनील बोदडे कारमधून प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांच्या कारवर हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. दरम्यान गोळी काचेत अडकल्याने पुढील अनर्थ टळला.

life saved of vanchit bahujan aghadi secretary buldhana know the reason
Kalamba Central Jail : कळंबा कारागृहात कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला, कारणंही आलं समाेर

पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या हल्ल्यात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडसह, बंदुकीचा वापर केला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनूसार तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत वाहनाच्या काचेचे नुकसान झाले. संशयितांचा तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

life saved of vanchit bahujan aghadi secretary buldhana know the reason
Wardha Rasta Roko Andolan : युवकाच्या हत्येच्या निषेर्धात देवळीत बसपाचा रास्ता राेकाे, 'त्या' झोपड्या उठविण्याची आंदाेलकांची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com