VBA Opposes Manusmriti In School Syllabus: मनुस्मृतीचे समर्थन करणारा शैक्षणिक आराखडा रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू : वंचितचा इशारा

Buldhana Vanchit Bahujan Aghadi Protest At Collector Office: विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्यासाठी शिकवण देण्याचं काम करण्याचा हा कट आहे. या गाेष्टीची आम्ही जाहीर निषेध करताे असे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटलं आहे.
vanchit bahujan aghadi opposes manusmriti in school syllabus1
vanchit bahujan aghadi opposes manusmriti in school syllabus Saam Digital
Published On

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा आराखडा जाहीर केलेला आहे. त्याचा निषेध बुलढाणा येथे वंचित बहुजन् आघाडीने केला आहे. वंचितने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हा आराखडा रद्द करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

वंचितने दिलेल्या निवेदनात मनुस्मृती ही माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. जर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा शैक्षणिक आराखडा अभ्यासक्रमाध्ये समाविष्ट केला तर इथं नव्याने मनुस्मृती आणण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराज - फुले - शाहू - आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जाणिवपूर्वक होताना दिसत आहे.

vanchit bahujan aghadi opposes manusmriti in school syllabus1
Lasalgaon Krushi Utpanna Bazar Samiti : लासलगाव बाजार समितीत शिवसेनेने कांदा लिलाव बंद पाडला, शेतक-यांतही सरकारविषयी असंताेष; जाणून घ्या कारण

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्यासाठी शिकवण देण्याचं काम करण्याचा कट आहे. या गाेष्टीची आम्ही जाहीर निषेध करताे असे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटलं आहे. हा मनुस्मृतीचा शैक्षणिक आराखडा रद्द करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील वंचितने सरकारला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

vanchit bahujan aghadi opposes manusmriti in school syllabus1
Sangli Dcc Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अधिकारी, कर्मचारी गायब? रघूनाथदादा पाटलांनी दिली 2 दिवसांची मुदत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com