Vegetable Price Hike: भाज्यांसह लसूण, टाेमॅटाेच्या दराने गृहिणींचं बजेट काेलमडलं, जाणून घ्या भाव

garlic tomato vegetables price hike in maharashtra : आगामी काळात भाजीपाल्यासह लसणाची आवक आणखीन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाव वाढणार हे मात्र निश्चित.
garlic tomato vegetables price hike in maharashtra
garlic tomato vegetables price hike in maharashtraSaam Digital
Published On

- सागर निकवाडे / राेहिदास गाडगे

पावसाळ्याच्या तोंडावर शहरी व ग्रामीण भागात भाजीपाल्यासह लसूण, टाेमॅटाेची मागणी वाढली आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्यांसह लसूण, टाेमॅटाेचे दर गगनाला भिडले आहेत. लसूण 200 ते 250 रुपये किलाे तर टाेमॅटाे 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत गेला आहे.

नंदुरबार शहरातील बाजारपेठेत दोन आठवड्यापूर्वी लसणाचे भाव 100 ते 120 रुपये किलो होते. परंतु, बाजारपेठेत लसणाची आवक घटल्याने दर 200 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत. अवकाळी पावसाचा फटका लसणाला बसला असून वातावरणाच्या बदलामुळे लसणाच्या उत्पादनात घट झाली आहे.

garlic tomato vegetables price hike in maharashtra
अवघ्या 20 सेकंदात 26 लाख रुपये चाेरले, नांदेडच्या व्यापा-याची पाेलिसांत धाव (पाहा व्हिडिओ)

उत्तर पुणे जिल्ह्याच्या ओतूर आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व शेतीमालाचे बाजारभाव सध्या चांगलेच तेजीत आहेत. या पुढच्या काळातही बाजार भाव असेच ते चढे राहतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

दुष्काळी संकट आणि अवकाळी पावसामुळे रोगराई आणि नुकसानीमुळे शेतीमालाच्या उत्पादनात विक्रमी घट झाल्याने आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आलेत.

बाजार समितीत बाजारभाव (10 किलो)

फ्लॉवर 200 रुपये

कोबी 170

मिरची 350

गवार :- 700

भेंडी :- 550

कांदा :- 250

टोमँटो :- 400 ते 900

डोबळी मिरची:- 500

वांगी :- 250

कारले :- 500

बटाटा :- 270

भाजीपाला (शेकडा)

मेथी :- 3601

कोथिंबीर :- 7001

शेपु :- 4001

Edited By : Siddharth Latkar

garlic tomato vegetables price hike in maharashtra
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com