Haryana Crime Saam Tv
क्राईम

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

Hariyana Crime: हरियाणामध्ये अल्पवयीन महिला खेळाडूवर कोचने बलात्कार केला. हॉटेलवर सरावासाठी बोलावून त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोचविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Summary:

  • हरियाणामध्ये महिला खेळाडूवर कोचने बलात्कार केला

  • हॉटेलवर बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला

  • कोचविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

  • या घटनेनंतर कोचला निलंबित करण्यात आले

हरियाणामध्ये अल्पवयीन महिला खेळाडूवर कोचने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. हॉटेलच्या खोलीमध्ये जबरदस्ती खेचत नेत कोचने हे भयंकर कृत्य केले. यावेळी पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला करिअर खराब करून टाकेल अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली होती. महिला खेळाडू दिल्लीमधील राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. कोचने तिला फरीदाबाद येथील सूरजकुंडमधील एका हॉटेल लॉबीमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. त्याने तिला सांगितले होते की त्याठिकाणी मी तुझ्या कामगिरीचा आढावा घेईल. त्यानंतर त्याने तिला हॉटेलमध्ये बुक केलेल्या खोलीत बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडित खेळाडूने त्याला नकार दिला. तर त्याने तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. त्याचसोबत तुझ्या कुटुंबाला जीवे मारेल अशी देखील धमकी दिली.

पीडिता घाबरली होती त्यामुळे तिने सुरूवातीला ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. नंतर तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे एनआयटी फरीदाबाद येथील पोलिस ठाण्यामध्ये आरोपी कोचविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील शूटर अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोपीविरोधात पोक्सो कायद्याच्या कलम ६ आणि फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे तपासत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी कोच हा नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने नियुक्त केलेल्या १३ राष्ट्रीय पिस्तूल कोचपैकी एक आहे. हे बलात्काराचे प्रकरण समोर आल्यानंतर या कोचविरोधात कारवाई करण्यात आली. आरोपी कोचला निलंबित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिलिंडरसाठी 2 तासांपासून रांगेत; उन्हात उभ्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

Accident News : बाइकवरून निघाले, शाळेसमोरच्या रस्त्यावरच अघटित घडलं; जेसीबीच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी १९३ खासदार एकवटले, ७ गंभीर आरोप

काँग्रेसचे 6 आमदार नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT